Neeraj Chopra: ऑलिंपिक रौप्य विजेत्या नीरज चोप्राला आता सुवर्णपदकाचा ध्यास; तांत्रिक बाबींमध्ये सुधारणेचा प्रयत्न
World Championship 2025: टोकियो आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये यश मिळवल्यानंतर आता नीरज चोप्रा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याच्या तयारीत आहे. भालाफेकीतील तांत्रिक चुका सुधारण्यावर त्याचा भर आहे.
गुरुग्राम : टोकियो व पॅरिस या दोन ऑलिंपिकमध्ये पदक पटकावत भारतासाठी इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राला आता सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचा ध्यास लागून राहिला आहे.