
Neeraj Chopra Recognized as 2024's Top Javelin Thrower:
टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
अमेरिकेतील ‘ट्रॅक अँड फिल्ड’ या क्रीडा क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मॅगझीनकडून नीरज चोप्रा याची २०२४ मधील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.