Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का! नीरज चोप्राने दुखापतीमुळे 'या' लीगमधून घेतली माघार

टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रा याने येत्या रविवारी होत असलेल्या पॅरिस डायमंड लीगमधून माघार घेतली आहे.
Neeraj Chopra opts out of Paris Diamond League
Neeraj Chopra opts out of Paris Diamond Leaguesakal

Neeraj Chopra : टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रा याने येत्या रविवारी होत असलेल्या पॅरिस डायमंड लीगमधून माघार घेतली आहे. मागील दोन महिन्यांपासून नीरज चोप्रा याला दुखापतीचा त्रास होत आहे. अन्‌ याच कारणामुळे त्याने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पॅरिस ऑलिंपिकला २६ जुलैपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर नीरज चोप्राची दुखापत चिंतेचा विषय ठरत आहे.

Neeraj Chopra opts out of Paris Diamond League
'आता त्यांनी फक्त...', रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या भवितव्याबाबत जय शहा स्पष्टच बोलले

एका क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नीरज चोप्रा म्हणाला, भाला फेकताना माझ्या पायाला बळकटी येणे आवश्‍यक आहे. कारण माझ्या कंबरेचा भाग खेचला जात आहे. भाला फेकताना कंबरेवरील प्रभाव कसा कमी करता येऊ शकेल यावर आम्ही काम करीत आहोत. पॅरिस ऑलिंपिकनंतर डॉक्टर बदलणार असून त्यानंतर अधिक उपचार केले जाणार आहेत.

Neeraj Chopra opts out of Paris Diamond League
Team India Captain: रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्या नाही, तर 'या' खेळाडूने करावे टीम इंडियाचे नेतृत्व, सेहवागने सांगितलं नाव

नीरज चोप्रा पुढे म्हणाला, मलाही अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला आवडते, पण माझ्या शरीराची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. हे मला वेळेत समजले. सरावासाठी मी अधिक मेहनत करीत आहे असे मला वाटते, तेव्हा थोडी विश्रांतीही घेतो. टोकियो ऑलिंपिकआधी ज्या स्पर्धेची प्रवेशिका भरायचो, त्या स्पर्धेमध्ये नक्की खेळायचो, पण आता चांगला अनुभव संपादन करता आला आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत असतो. याप्रसंगी शारीरिक तंदुरुस्तीकडेही लक्ष देत आहे.

Neeraj Chopra opts out of Paris Diamond League
T20 World Cup Final: ऋषभ पंतच्या चतुराईचा झाला फायदा अन् क्लासेनची गेली विकेट, गावसकरांनी सांगितलं कोणता क्षण ठरला महत्त्वाचा

तुर्कीमधील कामगिरीने मी समाधानी आहे, पण काही सुधारणा करावयाच्या आहेत. भाला घेऊन मी तुलनेने हळूवार धावत आहे. मला पूर्वीचा वेग मिळवायचा आहे. त्यासाठी तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. यानंतरच मला वेग वाढवण्याचा आत्मविश्‍वास कमवता येणार आहे.

- नीरज चोप्रा, भालाफेकपटू, भारत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com