Commonwealth Games 2022 : नीरजने माघार घेतल्यावर पाकिस्तानला का झाला आनंद?

Neeraj Chopra Withrow From Birmingham Commonwealth Games 2022 May Help Pakistan Arshad Nadeem
Neeraj Chopra Withrow From Birmingham Commonwealth Games 2022 May Help Pakistan Arshad NadeemESAKAL

नवी दिल्ली : भारताचा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतून (Birmingham Commonwealth Games 2022) दुखापतीमुळे माघार घेतली. त्याला जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत (World Athletics Championship) अंतिम फेरीत दुखापत झाली होती. त्याचा मांडीचा स्नायू दुखावला होता. तरी देखील नीरजने रौप्य पदकाची कमाई केली. मात्र आता डॉक्टरांनी त्याला एक महिना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्याने राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्याला दोन दिवस उरले असतानाच माघार घेतली. नीरज चोप्राच्या माघारीमुळे पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमला (Arshad Nadeem) चांगला फायदा होऊ शकतो. तो जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरीत पाचव्या स्थानावर होता.

Neeraj Chopra Withrow From Birmingham Commonwealth Games 2022 May Help Pakistan Arshad Nadeem
Commonwealth Games 2022 : बर्मिंगहममध्ये तिरंगा फडकला; पाहा Video

नीरजने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सची सुवर्णपदकावरील दावेदारी प्रबळ झाली आहे. जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत त्याने नीरजला मागे टाकत सुवर्ण पदक पटकावले. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने फायनलमधील आपले तीनही प्रयत्नात 90 मीटरपेक्षा जास्त लांब भाला फेकला होता. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत नीरजसारखा 88.13 मीटर भाला फेकणारा भालाफेकपटू नसल्याने त्याची सुवर्ण पदकाची दावेदारी प्रबळ झाली आहे. त्यामुळे खरी लढाई ही दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी म्हणजेच रौप्य आणि कांस्य पदकासाठी असणार आहे. जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकावर असणाऱ्या खेळाडूंपैकी तीन खेळाडू हे राष्ट्रकुल स्पर्धेत असणार नाहीत. त्यामुळे पाचव्या स्थानावर असलेल्या अर्शद नदीमला राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक पटकावण्याची चांगली संधी आहे.

Neeraj Chopra Withrow From Birmingham Commonwealth Games 2022 May Help Pakistan Arshad Nadeem
Chess Olympiad : नयनरम्य उद्घाटन सोहळा; मोदींचे आगमन

नीरजने अर्शद नदीमचे केले होते अभिनंदन

जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने अर्शद नदीमला भेटला होता आणि त्याची स्तुती केली होती. नीरज म्हणाला होता की दुखापत झाली असताना त्याने चांगला थ्रो केला होता. नीरज म्हणाला होता की, 'मी अर्शद नदीमचे दमदार थ्रोसाठी अभिनंदन करतो. त्याने दुखापत झाली असतानाही दमदार पुनरागमन केले.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com