Christchurch Mosque Shooting : न्यूझीलंड आणि बागंलादेश कसोटी सामना रद्द

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 मार्च 2019

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या अंदाधूंद गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडू थोडक्यात बचावले आहेत. संघातील सर्व खेळाडू मशिदीच्या आत जाणार तेवढ्यात गोळीबाराला सुरवात झाली अशी माहिती बांगलादेश क्रिकेट संघाचे प्रवक्ते जलाल युनूस यांनी दिली. तसेच संघातील सर्व खेळाडू सुखरूप आहेत मात्र, त्यांना मोठा धक्का बसला असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमिवर न्यूझीलंड आणि बागंलादेश यांच्यात हेग्ली ओव्हल येथे होणारा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे.

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे हा गोळीबार झाला आहे. यामध्ये जवळपास 40 जणांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, स्थानिक प्रसारमाध्यमांनी हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हल्लेखोराने लष्कर जवानांसारखे कपडे परिधान केले होते अशी माहिती आहे. मात्र अद्याप या माहितीला दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान गोळीबारानंतर परिसरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून, लोकांना घराबाहेर न येण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच एखादी संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Zealand and Bagaladesh Test matches Cancelled after Christchurch Mosque Shooting