Team India ODI Rankings: हरलं न्यूझीलंड फायदा झाला इंग्लंडचा; भारताची काय आहे स्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Zealand lose top spot in ODI rankings after defeat to India

Team India ODI Rankings: हरलं न्यूझीलंड फायदा झाला इंग्लंडचा; भारताची काय आहे स्थिती

Team India ICC Men's ODI Rankings : पहिल्या सामन्यात साडेतीनशे धावांचे पाठबळ असतानाही भारतीय दमछाक झालेल्या गोलंदाजांनी आपली शकते कर्तबगारी काय असू याचे प्रत्यंतर दुसऱ्या सामन्यात दिले. भारताने न्यूझीलंडच्या फलंदाजीची 108 धावांत दाणादाण उडवली आणि त्यानंतर आठ विकेटने मोठा विजय साकारून एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

हेही वाचा: IND vs AUS T20 WC: कांगारूकडून भारताचा दारुण पराभव, उपांत्य फेरीचा मार्ग आता कठीण

तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर आयसीसी पुरुष एकदिवसीय संघ क्रमवारीत (ICC Men's ODI Rankings) मोठा बदल झाला आहे. या पराभवामुळे न्यूझीलंडचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी आयसीसी वनडे क्रमवारीतील आपले अव्वल स्थान गमावले आहे. इंग्लंडचा संघ आता नंबर-1 बनला आहे.

हेही वाचा: Umesh Yadav : मोठी फसवणूक! भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला लाखो रुपयाचा लावला चुना

दुसऱ्या वनडेपूर्वी न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानावर होता. त्याला 115 गुण होते. इंग्लंड संघ 113 गुणांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया 112 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ 111 गुणांसह चौथ्या स्थानावर होता. दुसऱ्या वनडेत भारताच्या विजयानंतर समीकरणात मोठा बदल झाला. न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर घसरला आहे, तर भारताला एका स्थानाचा फायदा होऊन तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहे.(New Zealand lose top spot in ODI rankings after defeat to India)

हेही वाचा: Rohit Sharma : हे असं भारतात पहिल्यांदाच होतयं... सामन्यानंतर रोहितही झाला आश्चर्यचकीत

भारतीय संघाने शनिवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली आणि संपूर्ण संघ 34.3 षटकात 108 धावांत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 20.1 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. यासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे मंगळवारी इंदूरमध्ये खेळल्या जाणार आहे.