न्यूझीलंडच्या 'तेंडुलकर'ने केली निवृत्तीची घोषणा | Ross Taylor Retirement Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ross Taylor Retirement Marathi News

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध त्याने विजयी धाव घेतली होती.

न्यूझीलंडच्या 'तेंडुलकर'ने केली निवृत्तीची घोषणा

न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू रॉस टेलरने निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडचा तेंडुलकर म्हणलं तर वावगं ठरु नये अशा रॉस टेलरने सोशल मीडियावर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं आहे.(Ross Taylor Retirement Marathi News) त्यानं म्हटलं की, घरेलू समरनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. न्यूझीलंडकडून तो नेदरलँडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिके खेळणार आहे. त्याआधी बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका खेळणार आहे.

रॉस टेलर बांगलादेशविरुद्ध २ कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याच्या कारकिर्दीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ४ एप्रिलला हॅमिल्टनमध्ये खेळणार आहे. निवृत्तीनंतर तो देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे. त्याचा शेवटचा कसोटी सामना ९ जानेवारीला बांगलादेशविरुद्ध असणार आहे. त्यानं निवृत्तीची घोषणा करताना म्हटलं की, घरेलू समर संपल्यानतंर आंतरराष्ट्रीय निवृती जाहीर करत आहे. 17 वर्षे दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार, तसंच देशासाठी खेळणं हा माझ्यासाठी गौरव होता. (Ross Taylor Retirement Marathi News)

टेलरने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमधून पदार्पण केलं होतं. त्यानं ४४.८७ च्या सरासरीने ७ हजार ५८४ धावा केल्या. यात १९ शतकांचा समावेश आहे. तर २३३ एकदिवसीय सामने खेळताना त्यानं ८ हजार ५८१ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २१ शतकं आहे. याशिवाय १०२ टी २० सामने खेळताना त्यानं १९०९ धावा केल्या आहेत. भारताविरुद्ध जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विजयी धाव घेणारा रॉस टेलरच होता. टेलर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

Web Title: New Zealand Ross Taylor Retirement From All Format

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..