लॅथमचे दमदार शतक; पहिल्या वनडे सामन्यात किवींनी केला भारताचा 7 विकेट्स राखून पराभव | IND vs NZ 1st ODI | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Zealand vs India 1st ODI

IND vs NZ 1st ODI : लॅथमचे दमदार शतक; पहिल्या वनडे सामन्यात किवींनी केला भारताचा 7 विकेट्स राखून पराभव

New Zealand Vs India 1st ODI : टॉम लॅथम (नाबाद 145) आणि केन विलियम्सन (94) यांनी चौथ्या विकेटसाठी तब्बल 221 धावांची भागीदारी रचत भारताचे 306 धावांचे आव्हान 47.1 षटकातच पार केले. न्यूझीलंडने पहिल्या वनडे सामन्यात भारताचा 7 विकेट्स राखून पराभव करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून पदार्पण करणाऱ्या उमरान मलिकने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकात 7 बाद 306 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर शिखर धवन (72) आणि शुभमन गिल (50) यांनी 124 धावांची शतकी सलामी देत पाया रचला होता. यावर नंतर श्रेयस अय्यरने 80 तर वॉशिंग्टन सुंदरने 16 चेंडूत 37 धावा करत कळस चढवला. संजू सॅमसनने देखील 36 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसन आणि टीम साऊदीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

विलियम्सनने मारला विजय चौकार; पहिल्या वनडे सामन्यात भारताचा केला 7 विकेट्स राखून पराभव

शार्दुल ठाकूरची धुलाई; लॅथमने सहा चेंडूतच गाठला 77 पासून शंभरचा आकडा

शार्दुल ठाकूर टाकत असलेल्या 40 व्या षटकात टॉम लॅथमने तब्बल 25 धावा चोपून आपले शतक पूर्ण केले. याचबरोबर न्यूझीलंडने देखील सामन्यावरील आपली पकड अजून मजबूत केली. या षटकापूर्वी लॅथम 77 धावांवर होता. त्यानंतर षटक संपेपर्यंत त्याने शंभरी गाठली होती.

NZ 191/3 (36) : विलियम्सन - लॅथमची शतकी भागीदारी 

केन विलियम्सनने टॉम लॅथमच्या साथीने चौथ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचली. विलियम्समन आणि लॅथम दोघांनीही अर्धशतक ठोकत न्यूझीलंडला मजबूत स्थितीत पोहचवले.

175-3 (33 Ov) : कर्णधार केनने अर्धशतक डाव सारवला

उमरान मलिकने न्यूझीलंडला दोन धक्के दिल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने टॉम लॅथमच्या साथीने संघाचा डाव सावरला. त्याने संघाला 33 षटकात 175 धावांपर्यंत पोहचवले.

88-3  : उमरान मलिकचा धडाका

उमरान मलिकने आपल्या पहिल्याच स्पेलमधील पाचव्या षटकात त्यात तीव्रतेने आणि वेगाने मारा करत न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज टिपला. त्याने अनुभवी डॅरेल मिचलला 11 धावांवर बाद करत भारताची तिसरी आणि स्वतःची दुसरी विकेट मिळवली.

  68-2 : उमरान मलिकने पदार्पण लावले सार्थकी

भारतीय चाहत्यांच्या सततच्या मागणीनंतर अखेर वनडे संघात पदार्पण करण्याची संधी मिळालेल्या उमरान मलिकने आपले पदार्पण सार्थकी लावले. त्याने न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉरन कॉनवॉयला 24 धावांवर बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले.

35-1 : शार्दुल ठाकूरने मिळवून दिले पहिले यश

शार्दुल ठाकूरने फिन अॅलनला बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. फिनने 25 चेंडूत 22 धावा केल्या होत्या. त्याला शार्दुलच्याच गोलंदाजीवर युझवेंद्र चहलने जीवनदान दिले होते. मात्र त्याच षटकार शार्दुलने त्याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.

IND 306/7 (50) : सुंदरची अतीसुंदर फटकेबाजी

संजू सॅमसन शेवटी 5 षटके उरली असताना बाद झाल्यावर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने तुफान फटकेबाजी करत भारताला 300 चा टप्पा पार करून दिला. त्याने मॅट हेन्री टाकत असलेल्या 49 व्या षटकात 2 चौकार आणि 1 षटकार मारत भारताला 300 च्या पार पोहचवले. दरम्यान शेवटच्या षटकात 76 चेंडूत 80 धावा करणारा अय्यर बाद झाला. अय्यर बाद झाल्यानंतर सुंदरने साऊदीच्या चौथ्या चेंडूवर चौकारला. दरम्यान, डावाच्या शेटवच्या चेंडूवर शार्दुल ठाकूर बाद झाला अन् भारताचा डाव 50 षटकात 7 बाद 306 धावात संपुष्टात आला.

 254-5 : मोक्याच्या क्षणी संजू सॅमसन बाद 

श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी पाचव्या विकेटसाठी 94 धावांची दमदार भागीदारी रचली. मात्र डावच्या शेवटच्या 5 षटकात आक्रमक फटकेबाजी करण्याच्या नादात संजू सॅमसनी 38 चेंडूत 36 धावा करून मिलनेच्या चेंडूवर झेलबाद झाला.

श्रेयस अय्यरचे अर्धशतक

भारताचा डाव सावरणाऱ्या श्रेयस अय्यरने 55 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

210-4 (40 Ov) : अय्यर - सॅमसनने डाव सावरला

भारताची अवस्था 4 बाद 160 धावा झाली असताना संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरत भारताला 40 षटकात 200 पार पोहचवले.

160-4 : सूर्या देखील स्वस्तात परतला 

लोकी फर्ग्युसनने भारताचा 360 डिग्री खेळाडू सूर्यकुमार यादवला अवघ्या 4 धावांवर बाद करत भारताला चौथा धक्का दिला.

156-3  : ऋषभ पंतकडून पुन्हा निराशा 

शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी दमदार सलामी देऊनही चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंतला फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. तो 23 चेंडूत 15 धावा करून बाद झाला.

124-2 : दोन्ही सलामीवीर माघारी 

शुभमन गिल बाद झाल्यानंतर लगेचच टीम साऊदीने 77 चेंडूत 72 धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला देखील बाद करत भारताचा दुसरा सेट झालेला सलामीवीर माघारी धाडला.

124-1 : अर्धशतकानंतर शुभमन गिल लगेचच परतला

शिखर धवननंतर दुसरा सलामीवीर शुभमन गिलने देखील 65 चेंडूत अर्धशतक ठोकले. मात्र लॉकी फर्ग्युसनला एक फ्लिक मारण्याच्या नादात तो 50 धावांवर झेलबाद झाला.

शिखर धवनचे दमदार अर्धशतक

भारताचा कर्णधार शिखर धवनने सावध सुरूवातीनंतर धावांची गती वाढवत 65 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने शुभमन गिलच्या साथीने नाबाद शतकी सलामी दिली. दरम्यान, शुभमन गिल देखील आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता.

IND 90/0 (20) : शिखर धवन - शुभमन गिलने गिअर बदलला

शिखर धवन आणि शुभमन गिलने सावध सुरूवातीनंतर धावांची गती वाढवण्यास सुरूवात केली. या दोघांनी संघाला 20 षटकात 90 धावांपर्यंत पोहचवले.

IND 27/0 (7) : शिखर - शुभमनची सावध सुरूवात

भारताची सलामी जोडी शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी पॉवर प्लेमध्ये सावध सुरूवात केली.

न्यूझीलंडचा गोलंदाजीचा निर्णय

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने आपल्या प्लेईंग 11 मध्ये संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांचा समावेश केला आहे. आजच्या सामन्यात उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग वनडे क्रिकेटमध्ये आपले पदार्पण करणार आहेत.