World Cup 2023 : लगेच बंद करायचं.... भारत सरकारने बीसीसीआय, स्टार स्पोर्ट्सला दिली तंबी

World Cup 2023 Betting Gambling Advertisement
World Cup 2023 Betting Gambling Advertisementesakal

World Cup 2023 Betting Gambling Advertisement : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वर्ल्डकप 2023 दरम्यानच्या जाहिरातींबाबत कडक सूचना केली आहे. वर्ल्डकपमध्ये बेटिंग आणि गॅम्बलिंग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारती सरकारने बीसीसीआय आणि स्टार स्पोर्ट्सला सूचना केली आहे. जर या सूचनेकडे कानाडोळा केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी तंबीच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून दिली आहे.

World Cup 2023 Betting Gambling Advertisement
Shubman Gill News : प्रिन्स पडला किंगवर भारी; टीम इंडियातलं विराटपर्व लागलं उतरतीला?

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी एक प्रसिद्धी पत्रक काढले. यात त्यांनी, 'संबधित सर्व संघटना, यात माध्यमे, ऑनलाईन जाहिरात एजन्सी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांना सांगण्यात येत आहे की बेटिंग आणि गॅम्बलिंगला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती दाखवण्यापासून दूर राहवे.' असा सज्जड दम देण्यात आला.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या या पत्रकामुळे अनेक बेटिंग अ‍ॅपची डोकेदुखी वाढणार आहे. ड्रीम 11 हा टीम इंडियाचा स्पॉन्सर आहे. त्यांचा लोगो हा भारताच्या जर्सीवर झळकत असतो. मात्र बाकीच्या बेटिंग अ‍ॅप्सना स्पर्धेदरम्यान लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जाहिरातीचाच आधार आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाच्या या नव्या पत्रकामुळे एकाच बेटिंग अॅपचा फायदा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

World Cup 2023 Betting Gambling Advertisement
World Cup 2023 Tickets : श्रीमंतीचा फुसका बार! वर्ल्डकप तिकीट विक्रीच्या पहिल्याच दिवशी साईट अन् अ‍ॅप झालं क्रॅश

बेटिंग अ‍ॅपच्या जाहिराती करण्यासाठी खूप काळा पैसा वापरला जात आहे असे मंत्रालयाला वाटते. केंद्र सरकारकडून अशी तंबी येणे हे काही नवीन नाही. आयपीएल 2023 दरम्यान देखील अशाच प्रकारचे पत्रक जाहीर करण्यात आले होते.

भारतात होणारा वर्ल्डकप हा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्स हा या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करणार आहे. सरकारच्या नव्या पत्रकामुळे बीसीसीआय आणि डिज्ने स्टार यांना केंद्र सरकारच्या रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

(Sports Latest News)

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com