आरे ला कारे! धोनीला ट्रोल करणाऱ्या KKR ला जाडेजाचा कडक रिप्लाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Jadeja And MS Dhoni

आरे ला कारे! धोनीला ट्रोल करणाऱ्या KKR ला जाडेजाचा कडक रिप्लाय

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या अ‍ॅशेस मालिकेनं भारतीय क्रिकेटमधील वातावरण तापवले आहे. आयपीएलच्या मैदानात खेळणाऱ्या टीम आणि त्यांचे चाहते एकमेकांच्याविरुद्ध तुटून पडतात हे आपण याआधीही पाहिलं आहे. याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंड विरुद्ध सजवलेल्या फिल्डिंगमुळे सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni), गौतम गंभीर (GautamGambhir) आणि रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) ट्रेडिंगमध्ये आले आहेत. अ‍ॅशेस मालिकेतील सीनमुळे भारतीय क्रिकेटर ट्रेंडिगमध्ये येण्यामागे कोलकाता नाईट रायडर्सनं केलेले ट्विट कारणीभूत ठरले आहे.

काय आहे कोलकाता नाईट रायडर्सच ट्विट

कोलकाता नाईट रायडर्सने अ‍ॅशेस मालिकेतील अखेरच्या क्षणाला लावलेली फिल्डिंग आणि कोलकाता नाईट रायडर्सने ईडन गार्डनच्या मैदानात लावलेली फिल्डिग सेम टू सेम होती, या आठवणीला उजाला देण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅशेसमधील नजारा खास होता, असा उल्लेख करताना आम्हीही असा मास्टर स्ट्रोक खेळला होता, अशा आशयाचे ट्विट कोलकाता नाईट रायडर्सनं केले आहे.

KKR ट्विट अन् धोनी- गंभीर कनेक्शन...

कोलकाता नाईट रायडर्सच्या ट्विटवरुन जो फोटो शेअर करण्यात आलाय त्यात धोनी फलंदाजी करताना दिसतोय. गौतम गंभीरने यावेळी धोनीसाठी क्लोज फिल्डिंग लावली होती. 2016 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या संघावर बंदी असताना धोनी पुणे सुपर जाएट्सकडून खेळला होता. त्यावेळीच्या सामन्यात हा प्रकार घडला होता. कोलकाताने धोनीला ट्रोल केले नसले तरी सोशल मीडियावर धोनी समर्थक आणि गंभीर समर्थक यांच्यात ट्विटर वॉर सुरु झालाय. त्यामुळेच धोनी आणि गौतम गंभीरही सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहेत.

हेही वाचा: Ashes टेस्टमधील बेस्ट सीन; KKR ला आठवला धोनी वर्सेस गंभीर सामना

रविंद्र जाडेजानं काय दिलाय रिप्लाय..

चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या पसंतीने रिटेन करणाऱ्या रविंद्र जाडेजाने कोलकाता नाईट रायडर्सच्या ट्विटवर रिप्लाय दिलाय. हा मास्टर स्ट्रोक नसून फक्त दिखावा होता, असा कडक रिप्लाय देत त्याने धोनीसाठी बॅटिंग केल्याचे पाहायला मिळते. त्याचा हा रिप्लाय अनेकांना भावला आहे.

Web Title: Not A Master Stroke Ravindra Jadeja Responds After Kkr Takes Dig At Ms Dhoni

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top