esakal | डेव्हिस करंडकात जोकोविच सहभागी 
sakal

बोलून बातमी शोधा

Novak Djokovic

डेव्हिस करंडकात जोकोविच सहभागी 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बेलग्रेड : सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच डेव्हिस करंडक पुरुष सांघिक स्पर्धेत रशियाविरुद्ध मायदेशातील जागतिक गटाच्या लढतीत खेळेल.

तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान नीसमध्ये ही लढत होईल. जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्याच फेरीत हरला. आधीच्या नियोजनानुसार तो खेळणार नव्हता; पण आता वेळ असल्यामुळे तसेच फॉर्म मिळविण्याच्या उद्देशाने तो खेळेल.

सर्बियाने 2010 मध्ये डेव्हिस करंडक जिंकला. आतापर्यंतच्या एकमेव विजेतेपदामध्ये जोकोविचचा मोलाचा वाटा होता. दीर्घ काळ प्रशिक्षक राहिलेल्या बॉग्डान ओब्राडोविच यांच्यानंतर नेनाद झिमॉंजीच यांच्याकडे सूत्रे आली आहेत. त्यांच्यासाठी पूर्ण ताकदीचा संघ उपलब्ध असणे स्वागतार्ह ठरले आहे.

जोकोविच म्हणाला, की डेव्हिस करंडकात खेळण्यात मी नेहमीच उत्सुक असतो. आम्ही सर्व खेळाडू एकत्र येतो, तेव्हा फार छान वाटते.

loading image