Laver Cup Tennis tournament : रॉजर फेडरर सर्वोत्तम खेळाडू; जोकोविच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

novak djokovic roger federer greatest laver cup rafael nadal

Laver Cup Tennis tournament : रॉजर फेडरर सर्वोत्तम खेळाडू; जोकोविच

लंडन : २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘लेव्हर कप’ टेनिस स्पर्धेनंतर रॉजर फेडरर निवृत्त होणार आहे. युरोप संघ विरुद्ध जागतिक संघादरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत रॉजर फेडरर हा युरोपच्या संघात राफेल नदाल, नोवाक जोकोविच आणि अँडी मरे या त्याच्या आयुष्यातील तीन सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर खेळणार आहे. फेडररने आधीच जाहीर केल्याप्रमाणे तो यंदाच्या लेव्हर कप स्पर्धेत फक्त दुहेरीचे सामने खेळणार आहे. फेडररच्या निवृत्तीबद्दल पत्रकारांशी बोलताना त्याचा प्रतिस्पर्धी आणि २१ वेळा ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविच म्हणाला की, ‘फेडरर हा जगातील सर्व खेळांमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असून; त्याच्या असामान्य २४ वर्षांच्या खेळामुळे त्याने टेनिसजगतात एक वारसा मागे सोडला आहे.’

फेडररचा टेनिस खेळावरील प्रभाव हा अजूनही टिकून असून त्याचे बॅकहँड, टेनिस लीलया खेळण्याची पद्धत हे सर्वच एका टेनिसप्रेमींना सुखावणारे होते, असेही जोकोविच पुढे म्हणाला. जोकोविचने आतापर्यंत ४ वेळा फेडररचा ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामान्यत पराभव केला असून; २०१९ मधील विम्बल्डनचा अंतिम सामना हा फेडररच्या आयुष्यातील शेवटचा ग्रँडस्लॅम अंतिम सामना होता. २०१९ च्या ऑस्ट्रेलियन ओपन नंतर लेव्हर कप स्पर्धेत फेडरर, नदाल, जोकोविच आणि मरे हे पहिल्यांदाच एकत्र खेळणार आहेत.

शेवटचा सामना

नदालबरोबर खेळणार

फेडरर टेनिस कोर्टवरील कट्टर प्रतिस्पर्धी तसेच मैदानाबाहेरचा तेवढाच चांगला मित्र असणाऱ्या नदालबरोबर कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. नदाल आणि फेडरर या जोडीसमोर जॅक सॉक आणि फ्रान्सिस थिआफो यांचे आव्हान असणार आहे. फेडररचा शेवट गोड व्हावा अशी आशा तमाम टेनिसप्रेमी करीत असतील.

Web Title: Novak Djokovic Roger Federer Greatest Laver Cup Rafael Nadal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sportstennis