esakal | टेनिस जगतात खळबळ : नंबर वन टेनिस स्टार जोकोविचला कोरोनाची लागण

बोलून बातमी शोधा

novak djokovic tested corona positive

एड्रिया टूरच्या दुसऱ्या टप्प्यातील  स्पर्धेत अंतिम लढतीच्या अगोदर माघार घेतलेला बल्गेरियाचा खेळाडू ग्रिगोर दिमित्रोवला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. आता जोकोविचलाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. 

टेनिस जगतात खळबळ : नंबर वन टेनिस स्टार जोकोविचला कोरोनाची लागण
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : जगातील नंबर वन टेनिस स्टार नोवाक जोकोविचची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. जोकोविचची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याचे आता समोर आले आहे. जोकोविचने नुकतंच सार्बिया आणि क्रोएशियात झालेल्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धांमधील अनेक खेळाडूंना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नोकाव जोकोविचने कोरोनाची टेस्ट केली होती.

क्रीडा जगतातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एड्रिया टूरच्या दुसऱ्या टप्प्यातील  स्पर्धेत अंतिम लढतीच्या अगोदर माघार घेतलेला बल्गेरियाचा खेळाडू ग्रिगोर दिमित्रोवला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्याशिवाय बोर्ना कोरिक या खेळाडूला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. टेनिस जगतातील या नामांकित खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने क्रीडा क्षेत्रासहित टेनिस जगत हादरले होते. त्यातच आता जोकोविचला कोरोना झाल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान, एड्रिया टूरच्या आयोजकांनी देखील याची गंभीर दखल घेत, टूर्नामेंटच्या दुसऱ्या टप्प्यातील अंतिम लढत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रीडा जगतातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सर्वच खेळांचे आयोजन थांबविण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाची खबरदारी घेत क्रीडाविश्वातील विखुरलेली परिस्थिती पुन्हा सामान्य करण्याचा प्रयत्न केला जात होता. अशावेळी जगातील पहिल्या स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविकने बेल्ग्रेड येथे चॅरिटीकरिता टेनिस टूर्नामेंटचे आयोजन केले होते. मात्र या टूर्नामेंटच्या दुसऱ्या सत्रात  ग्रिगोर दिमित्रोव आणि बोर्ना कोरिक या दोन नामांकित खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.