

Novak Djokovic
esakal
लंडन: सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविच याने ३९ व्या वर्षी विम्बल्डन या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेची पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. या पठ्ठ्याने मंगळवारी मध्यरात्री पार पडलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फेलिक्स ऑगर एलियासिम याचे कडवे आव्हान पाच सेटमध्ये परतवून लावत अंतिम चार फेरीमध्ये प्रवेश केला. ही लढत पाच तास १५ मिनिटे रंगली.