

Novak Djokovic
esakal
लंडन: विम्बल्डन उपांत्य फेरीत यानिक सिनरकडून एकतर्फी पराभव पत्करावा लागलेल्या नोवाक जोकोविचचे २५व्या ग्रँड स्लॅमचे स्वप्न पुन्हा भंगले, मात्र निराशेपेक्षा त्याने उमेद कायम ठेवली. सात वेळा विम्बल्डन विजेता ठरलेला ३९ वर्षीय जोकोविच सिनरकडून ४-६, ४-६, ४-६ असा सरळ सेटमध्ये पराभूत झाला. सेंटर कोर्टवरून प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात बाहेर पडला. त्यानंतर अनेकांच्या मनात हा त्याचा अखेरचा विम्बल्डन ठरेल का, असा प्रश्न निर्माण झाला होता.