Video : जिथं हॅप्पी न्यू इयरचं पहिलं सेलिब्रेशन तिथंच पहिली सेंच्युरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devon Conway

Video : जिथं हॅप्पी न्यू इयरचं पहिलं सेलिब्रेशन तिथंच पहिली सेंच्युरी

New Zealand vs Bangladesh, 1st Test: बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज ड्वेन कॉन्वेनं (Devon Conway) दमदार शतकी खेळी साकारली. त्यानं नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी झळकवलेलं शतक खास असंच आहे. कॉन्वेनं पहिल्या 7 कसोटी सामन्यात चार वेळा 50 किंवा त्याच्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे चौथे शतक आहे. मागच्या वर्षी जूनमध्ये त्याने इंग्लंड विरुद्धच्या लढतीतून पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात लॉर्ड्सच्या मैदानात त्याने द्विशतक झळकावले होते. टेस्ट कारकिर्दीत घरच्या आणि परदेशी मैदानात पहिल्या डावातच शतकी खेळी साकारणारा तो सहावा खेळाडूही ठरलाय.

नव्या वर्षांतील पहिलं शतक

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात कॉन्वेनं 227 चेंडूत 122 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 16 चौकार आणि 1 शतक झळकावले. विशेष म्हणजे मागच्या वर्षातील पहिलं शतकही न्यूझीलंडच्या फलंदाजानेच झळकावले होते. 2021 वर्षातील पहिले शतक हे केन विल्यमसनच्या भात्यातून आले होते. त्याच्याआधी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेन याने पहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते.

Bay Oval, Mount Maunganui च्या मैदानात बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉम लॅथमच्या रुपात न्यूझीलंडने पहिली विकेट स्वस्तात गमावली. त्याने अवघ्या एका धावेची भर घातली. त्यानंतर सलामीवीर विल यंग (Will Young) आणि ड्वेन कॉ़न्वे जोडीनं (Devon Conway) संघाचा डाव सावरला. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. विल यंग 135 चेंडूत 52 धावा करुन तंबूत परतला.

रॉस टेलर 31 आणि टॉम ब्लुडेंल 11 धावा करुन माघारी फिरले आहेत. कॉन्वेचं शतक आणि विंग यंगच्या अर्धशतकाच्या जोरावर घरच्या मैदानावर खेळणाऱ्या न्यूझीलंडनं पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडने धावफलकावर 5 बाद 258 धावा केल्या आहेत. बांगलादेशकडून इस्लाम (Shoriful Islam) दोन तर हुसेन (Ebadot Hossain) आणि मोमिनुव (Mominul Haque) यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. विल यंगने रन आउटच्या रुपात विकेट फेकली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top