Nz vs Ban 3rd T20 : न्यूझीलंडच्या टॉप-5 पैकी 4 फलंदाजांच्या 1-1 धावा! तरीही किवीसमोर बांगलादेश टायगर रडलं

New Zealand beat Bangladesh 3rd T20 Marathi News
New Zealand beat Bangladesh 3rd T20 Marathi Newssakal

New Zealand beat Bangladesh 3rd T20 : बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका अतिशय रोमांचकारी पद्धतीने संपली. माउंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशचा संघ अवघ्या 110 धावांत गारद झाला.

प्रत्युत्तरात 49 धावांपर्यंत मजल मारली तोपर्यंत न्यूझीलंडचा निम्मा संघही पॅव्हेलियनमध्ये परतला होता. येथे जेम्स नीशम आणि मिचेल सँटनर यांनी 46 धावांची नाबाद भागीदारी करत किवी संघाला विजय मिळवून दिला.

खरेतर, जेव्हा न्यूझीलंडला विजयासाठी 32 चेंडूत 16 धावांची गरज होती, तेव्हा पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून निकाल काढावा लागला. येथे किवी संघाला 17 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. अशाप्रकारे बांगलादेशने न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका जिंकण्याची संधी गमावली.

New Zealand beat Bangladesh 3rd T20 Marathi News
Team India 2024 Full Schedule : 2024 मध्ये टीम इंडियाचा कधी अन् कोणत्या संघाविरुद्ध रंगणार थरार? जाणून घ्या शेड्यूल

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवी गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासून विकेट्स घेण्यास सुरुवात केली. टीम सौदीने सामन्याच्या चौथ्या चेंडूवर सौम्या सरकारला (4) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर बांगलादेश संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला. अशाप्रकारे बांगलादेशचा संपूर्ण संघ 19.2 षटकांत एकूण 110 धावांत गडगडला.

111 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवातही खराब झाली. टीम सेफर्ट, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमन प्रत्येकी एक धाव घेऊन पॅव्हेलियनमध्ये परतले.

फिन ऍलनने 38 धावांची खेळी खेळली आणि काही काळ डाव सांभाळला, त्यानंतर तोही एकूण 49 धावा करून आऊट झाला. येथून नीशम (28) आणि सँटनर (18) यांनी नाबाद 46 धावा जोडत किवी संघाला विजयाच्या मार्गावर परतवले.

New Zealand beat Bangladesh 3rd T20 Marathi News
Sa vs Ind 2nd Test : विराट कोहलीचा उत्तराधिकारी 'प्रिन्स' शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये होतोय का फ्लॉप?

किवींनी 14.4 षटकात 5 गडी गमावून 95 धावा केल्या असताना पाऊस सुरू झाला आणि लक्ष्य सुधारावे लागले. येथे न्यूझीलंडला 14.4 षटकांत 79 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्याने खूप आधी पार केले होते. अशा स्थितीत किवी संघाला 17 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. मिचेल सँटनर 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला. त्याने 4 विकेट्स घेतल्या आणि 18 धावांची इनिंग खेळली.

या विजयासह किवी संघाने तीन सामन्यांची टी-२० मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने जिंकला होता आणि दुसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ हा पुरस्कार बांगलादेशच्या शरीफुल इस्लामला मिळाला. या मालिकेत त्याने एकूण 6 विकेट घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com