ODI WC 2023 : सामना संपल्यानंतरही थांबला नाही राडा! श्रीलंकन खेळाडूंनी टाळले हस्तांदोलन अन्...

Controversy erupts as Angelo Mathews given Timed Out
Controversy erupts as Angelo Mathews given Timed Outsakal

Controversy erupts as Angelo Mathews given Timed Out : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही न घडलेली घटना आज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात घडली. फलंदाज उशिरा मैदानात येण्याचा आणि चेंडू खेळण्याचा (टाइम आऊट) असा नियम असला तरी आजपर्यंत त्याचा कोणी वापर केला नव्हता; परंतु श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने जाणीवपूर्वक कोणताही वेळाकाढूपण केला नसला तरी बांगलादेश कर्णधार शकिब अल हसनने त्याच्याविरुद्ध अपील केले आणि पंचांनी नियमानुसार त्याला बाद ठरवले; परंतु यात खिलाडूवृत्तीची ऐशीतैशी झाली.

फिरोजशा कोटला मैदानावरील या सामन्याचे महत्त्व उपांत्य फेरीच्या स्थानासाठी संपले आहे. दोन्ही संघांची केवळ प्रतिष्ठा पणास लागलेली आहे; परंतु २५ व्या षटकात घडलेला प्रसंग आश्चर्यचकित करणारा ठरला.

काय घडले...

  • २४.२ षटकांत श्रीलंकेचा समरविक्रमा बाद झाला.

  • श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज वेळेत फलंदाजीस आला.

  • त्याने खेळपट्टीला नमस्कार करून गार्डही घेतला.

  • डोक्यावरील हेल्मेट व्यवस्थित करण्यासाठी त्याची पट्टी ओढली.

  • पट्टी ओढल्यामुळे हेल्मेटमधील आतील एक भाग तुटला.

  • त्यामुळे त्याने लगेचच दुसऱ्या हेल्मेटची मागणी केली.

  • पर्यायी हेल्मेट घेऊन राखीव खेळाडू मैदानात येत होता.

  • त्यावेळी गोलंदाज असलेला बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने पंचांकडे अपील केले आणि पंचांनी ते ग्राह्य धरून टाइम आऊटच्या नियमाने मॅथ्यूजला बाद केले.

नियम काय सांगतो?

एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर येणाऱ्या पुढच्या फलंदाजाने तीन मिनिटांच्या आत पुढचा चेंडू खेळला पाहिजे, अन्यथा तो टाइम आऊट होऊ शकतो. येथे मॅथ्यूज वेळेत क्रीजमध्ये आला होता; परंतु हेल्मेटमधील भाग तुटल्यामुळे चेंडू खेळण्यापूर्वी तीन मिनिटे वाया गेली होती.

बांगलादेशचा विजय, श्रीलंकेच्या खेळाडूंनी हस्तांदोलन टाळले

मॅथ्यूज ‘टाइमआऊट’ या प्रकरणातून सावरणाऱ्या श्रीलंकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २७९ धावांपर्यंत मजल मारली. मॅथ्यूजला बाद ठरवण्यात आले तेव्हा श्रीलंकेची अवस्था ५ बाद १३५ अशी झाली होती, पण दुसऱ्या बाजूने चरिथ असलंकाने १०८ धावांची शतकी खेळी साकार केली. बांगलादेशने हे आव्हान सात फलंदाजांच्या मोबदल्यात पार करुन विजय मिळवला, परंतु सामना संपल्यानंतर श्रीलंकन खेळाडूंनी हस्तांदोलन टाळले. शकिबला अखेर मॅथ्यूजने बाद केले.

नियमानुसार बाद झालेले पहिले फलंदाज

  • झेलचीत ः टॉम हारून (१८७७)

  • त्रिफाळाचीत ः नॅट थॉमसन (१८७७)

  • धावचीत ः डेव्ह ग्रेगरी (१८७७)

  • पायचीत ः जॉर्ज उलेट (१८७७)

  • यष्टिचीत ः अलफ्रेड शॉ (१८७७)

  • स्वयंचीत ः जॉर्ज बोन्नर (१८८४)

  • जखमी निवृत्तबाद ः बान्नेरमन (१८७७)

  • चेंड हाताळून बाद ः रसेल एन्डिन (१९५७)

  • क्षेत्ररक्षणात अडथळा ः लेनॉर्ड हटन (१९५१)

  • निवृत्तबाद ः अटापट्टू (२००१)

  • चेंडू दोनदा मारल्यामुळे बाद ः फॅनयन मुघाल (२०२३)

  • टाइम आऊट ः अँजेलो मॅथ्यूज (२०२३)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com