"महिला क्रिकेटर्सना पुरुष खेळाडूंची वापरलेली जर्सी दिली जायची" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Womens cricket team
"महिला क्रिकेटर्सना पुरुष खेळाडूंची वापरलेली जर्सी दिली जायची"

"महिला क्रिकेटर्सना पुरुष खेळाडूंची वापरलेली जर्सी दिली जायची"

भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटवेडे अनेक लोक इथं पाहायला मिळतात. मात्र तरीही महिला क्रिकेटला पुरुष क्रिकेटइतकं महत्त्व दिलं जात नाही, अशी खंत वारंवार ऐकायला मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये महिला क्रिकेटर्सना मिळालेल्या सुविधा तसंच त्यांना मिळणारी वागणूक याबद्दल काही धक्कादायक खुलासे झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या व्यवस्थापक समितीचे विनोद राय हे अध्यक्ष होते.बीसीसीयच्या अध्यक्षपदाचा कारभार काही काळ त्यांच्या खांद्यावर होता. आपल्या नव्या पुस्तकात त्यांनी नमूद केलं आहे की महिला क्रिकेटर्सना जेवढा मिळायला हवा तेवढा सन्मान आणि सोयी सुविधा मिळाल्या नाहीत. विनोद राय म्हणाले, "दुर्दैवाने २००६ पर्यंत महिला क्रिकेटचं गांभीर्य लक्षात आलंच नव्हतं. जेव्हा शरद पवार यांनी महिला आणि पुरुष क्रिकेट असोसिएशनचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा परिस्थिती सुधारली."

हेही वाचा: वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने समोसा खाऊन दिवस काढला?

राय पुढे म्हणाले,"महिला क्रिकेटर्सना आवश्यक त्या सुविधाही मिळाल्या नाहीत. महिला क्रिकेटर्सना पुरुष खेळाडूंनी वापरलेली जर्सी कापून, फिटींग करून महिला खेळाडूंचं नाव लिहून दिली जायची. जेव्हा ही धक्कादायक गोष्ट माझ्या लक्षात आली, त्यावेळी मी नाइकी(Nike)सोबत बोललो आणि मग महिला खेळाडूंसाठी चांगल्या जर्सींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. "

Web Title: Old Jerseys Of Men Players Given To Women Cricketers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..