
Wrestling World Championships : भारताला मोठा धक्का, ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंगचा पराभव
Wrestling World Championships : भारताचा ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंग पुनियाला जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 65 किलो वजनी गटात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर दुसरीकडे 74 किलो वजनीगटात सागर जगलानने कांस्य पदकावर आपली पकड मजबूत केली आहे.
दोन वेळचा राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेत्या बजरंग पुनियाला जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 10 - 0 अशा मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. 23 वर्षाच्या अमेरिकेच्या यिआनी दिआकोमिहालिसने 65 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत बजरंगचा पराभव केला. बजरंगने आतापर्यंत तीन जागतिक अजिंक्यपद पदके पटाकवली आहेत. आता बजरंग पुनियाला त्याला पराभूत केलेला प्रतिस्पर्धी दिआकोमिहालिस अंतिम फेरीत जाण्याची वाट पहावी लागेल जेणेकरून बजरंग पुनिया कांस्य पदकाच्या लढतीसाठी पात्र होऊ शकेल.
यापूर्वी बजरंग पुनियाने क्युबाच्या अलजेंद्रो एन्रिक वाल्डेस टोबिअरचा 5 - 4 असा पराभव केला होता. तर 18 वर्षाच्या जगलानने 74 किलो वजनीगटात मंगोलियाच्या ओलोनबायारचा 7 - 3 असा पराभव केला होता.