esakal | तू मॅच नव्हे सर्वांची मनं जिंकलीस...!
sakal

बोलून बातमी शोधा

Mary Kom and Ingrit Valencia

तू मॅच नव्हे सर्वांची मनं जिंकलीस...!

sakal_logo
By
आकाश बोकमुरकर

प्रिय मेरी,

तुझं आजची मॅच हारणं माझ्यासारख्या माणसाला न पचण्यासारखंच आहे. कारण तू कायम जिंकावीस असंच वाटतं सारखं. फक्त 3-2 च्या फरकाने हारलीस तू. फायनल रिझल्ट वेळी पंचांनी तुझ्या विरोधी प्लेयरला विजयी घोषित केलं, तेंव्हा माझ्या डोळ्यात टचकण पाणी आलं. तुही रडत होतीस पण खिलाडू वृत्तीने तू तुझ्या विरोधकाला मिठी मारलीस, तिच्या आनंदात सहभागी झालीस. तू हसत हसत सगळ्या प्रेक्षकांना अभिवादन केलंस. आपण ऑलिम्पिक मधून बाहेर पडलोय म्हणून तुझे डोळे भरून आलेले , पण अशा वेळी तुझ्या चेहऱ्यावर हसू ठेवलंस. यावेळी तू मॅच नाही सर्वांचं मन जिंकलस...(Olympics 2020 Mary Kom Loss Match But win peoples hearts Special Article)

सगळ्यांना फक्त मेरी कोम हे फक्त नाव माहित होतं. पण जेंव्हा तुझा पिक्चर आला तेंव्हा तू आणि तुझा संघर्ष घराघरात पोहोचला. एखाद्या गोष्टीत सुरुवात करणं किती अवघड असेल? तुला किती त्रास सहन करायला लागला असेल? याची कल्पना मी आता या काळात करूच शकत नाही.

हेही वाचा: Olympics : सुपर मॉमचा स्पर्धेतील प्रवास थांबला!

2000 पासून ते आतापर्यंत तू फक्त बॉक्सिंगचं खेळत आलीस. तू फक्त चांगली खेळाडू नव्हे,तर याचं प्रक्रियेत मुलांना जन्म देऊन चांगली आई आणि पत्नी झालीस. कॉमनवेल्थ, आशियायी स्पर्धा, ऑलम्पिकचं ब्रॉन्झ मेडल हे सगळं जिंकलस, तरीही एक गोष्ट मागे राहिलेली... तुझा हातावरचा ऑलम्पिकचा tatoo पाहिला कि लक्षात येतं कि तू फक्त ऑलम्पिकच्या गोल्ड मेडल ची भुकेलेली होतीस. पण तुझी ती भूक अर्थवट राहिली. पण एक सांगू मेरी तुझ्या आजवरच्या खेळाने आम्ही खूप खूष आहोत. आम्ही कधीच समाधानाची ढेकर दिलीय.

हेही वाचा: Olympics : 'आर्मी मॅन खली' पदकापासून एक पाउल दूर (VIDEO)

तुझं वय 38 आहे अगं. कदाचित तुझं हे शेवटचं ऑलम्पिक असेल, त्यामुळे रिंग मधून बाहेर पडताना तुझ्या मनात काय चालू असेल? याचा अंदाज लावू शकत नाही कोणीच. शेवटच्या राऊंडला तू दमलीस. घालमेल झाली तुझी. तेच जास्त मनाला लागलं.त्याच वेळी सगळं आठवलं... तूच भारताकडून खेळणारी पहिली पोरगी आहेस. तुझ्याकडे बघूनच अनेक पोरा -पोरींनी पंच मारण्याचं धाडस केलंयं. तू 4 पोरांची आई आणि 6 वेळाची वर्ल्ड चॅम्पियन आहेस.भारतातली पोरगी काहीही करू शकते, घरातून बाहेर पडून ती जग जिंकू शकते! हे दाखवून देऊन अनेक पोरींना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी, अनेक पोरींना घडवण्यासाठी

loading image
go to top