esakal | Olympics : 'सुपर मॉम'कडून पदकी 'पंच'ची अपेक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Mary Kom

Olympics : 'सुपर मॉम'कडून पदकी 'पंच'ची अपेक्षा

sakal_logo
By
सुशांत जाधव

वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जे पुरुषांना जमलं नाही ती कामगिरी एमसी मेरी कोम हिने करुन दाखवलीये. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमच्या नावे सर्वाधिक 8 पदकांची नोंद आहे. एमसी मेरी कोमचे संपूर्ण नाव मांगते चुंगनेजंग मेरी कोम असे आहे. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरणारी ती भारताची पहिली महिला ठरली होती. त्यावेळी तिने कांस्य पदकाची कमाई देखील केली होती. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा मेरी कोमसाठी शेवटची असेल, असे मानले जाते. यात ती देशाची मान उंचावणारी कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून पहिल्यांदाच उद्घाटन कार्यक्रमात पुरुष आणि महिला गटातून ध्वजवाहकाची निवड करण्यात आली आहे. महिला गटातून हा सन्मान मेरी कोमला मिळाला आहे. (olympics 2020 medal prediction Indian amateur boxer Mary Kom)

6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या मेरी कोमने वयाच्या 18 व्या वर्षी बॉक्सिंगमध्ये करियरला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे 1998 ते 2000 या दरम्यान ती बॉक्सिंगची ट्रेनिग करत आहे याचा थांगपताही तिच्या घरच्यांना नव्हता. 2000 मध्ये मेरी कोमने वुमन चॅम्पियनशिप जिंकली त्यावेळी तिच्या घरच्यांना तिच्या या मोठ्या संकल्पाबद्दल समजले. या विजयाचा आनंद कुटुंबियानेही साजरा केला.

2001 मध्ये मेरी कोमने कारकिर्दीतील पहिले वहिले आंतरराष्ट्रीय पदक पटकावले. अमेरिकेतील महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 48 किलो वजनी गटात तिने रौप्य पदकाची कमाई केली होती. 2002 ते 2008 दरम्यान तिने 10 पदके मिळवली यात 9 सुवर्ण पदकाचा समावेश होता. 2009 ते 2019 या कालावधीत मेरी कोमने 12 पदकांची कमाई करताना 9 सुवर्ण पदके पटकावली. तिचा हा प्रवास थक्क करुन सोडणारा असाच आहे.

2000 मध्ये मेरी कोम आणि फुटबॉलपटू कॅरुग ओनले यांच्यातील प्रेम कहाणीला सुरुवात झाली. 2005 मध्ये या दोघांनी आयुष्याची नवी इनिंग सुरु केली. मेरी कोमला दोन जुळी मुले आहेत. या मुलांना जन्म दिल्यानंतर तिच्या करियरसंदर्भात अनेक चर्चा रंगल्या. पण 2008 मध्ये मेरी कोमन धमाकेदार कमबॅक केले. आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने सुपर मॉमची पॉवर दाखवून दिली. मेरी कोम 51 किलो वजनी गटातून बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरणार आहे. तिच्याकडून पदकाची आस आहे.

loading image