Olympics : मानाच्या स्पर्धेत शिक्षेचा भोग! जाणून घ्या रशियाचा दोष

...म्हणून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत एक वेगळच चित्र पाहायला मिळत आहे.
ROC
ROCTwitter
Updated on

जगातील मानाच्या स्पर्धेत पदक मिळवून राष्ट्रध्वज घेऊन मिरवण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू पाहत असतो. जगभरातून अनेक देशातील खेळाडू हेच स्वप्न बाळगून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत असतात. पण टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत एक वेगळच चित्र पाहायला मिळत आहे. गुणतालिकेत 10 गोल्डसह अव्वल पाच राष्ट्रात समावेश असणारा ROC देश कोणता? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. हा कोणताही वेगळा देश नाही. तर रशियन ऑलिम्पिक समितीच्या नावाखाली रशियाचे खेळाडू स्पर्धेत खेळत आहेत. (Tokyo Olympic You Know Why are Russians competing under the name ROC)

आता हे उत्तर मिळाल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल रशियावर ही वेळ का आली? जगातील मानाच्या स्पर्धेत त्यांच्या राष्ट्राच्याध्वजाखाली का उतरता आले नाही, याचाच वेध आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 2020 च्या Tokyo Olympic स्पर्धेत रशियाचे 335 खेळाडू वेगवेगळ्या खेळात सहभागी झाले आहेत. पण त्यांना ना राष्ट्राचे नाव लावण्याची परवानगी आहे ना राष्ट्रध्वज घेऊन मिरवण्याची. आतापर्यंत 10 खेळाडूंनी सुवर्ण पदकाची कमाई केली. पण ते पदक स्विकारताना रशियन राष्ट्रगीत वाजल नाही.

ROC
Olympics : दुसऱ्या सेटमध्ये 'कांटे की टक्कर'; सिंधूनं गाठली सेमीफायनल

2020 च्या पदतालिके रशियन खेळाडूच्या नावासमोर ROC (रशियन ऑलिम्पिक समिती) असे नाव पाहायला मिळते. याला एक खास कारण आहे. ते म्हणजे रशियाला ऑलिम्पिक खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. डिसेंबर 2019 मध्ये जागतिक उत्तेजक विरोधी संस्था (WADA) ने रशियावर चार वर्षांची बंदी घातलीये. त्यामुळे रशियाला Tokyo Olympic आणि 2022 च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये भाग घेता येणार नाही.

ROC
Olympics : जोकोविचच्या 'गोल्डन स्लॅम'च्या स्वप्नाला सुरुंग

डोपिंग टेस्टसाठी खेळाडूंचे चुकीचे सॅम्पल पाठवण्याचा आरोप रशियावर झाला होता. त्यानंतर रशियावर बंदीची कारवाई करण्यात आलीये. याबंदीमुळे वाडाशी संगलग्नित कोणत्याही स्पर्धेचे रशियाला यजमानपद भूषवता येणार नाही. तसेच खेळाडूंनाही राष्ट्राच्याध्वजखाली खेळण्यावर बंदी आहे. रशियन खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची परवानगी आहे. पण शिक्षेच्या स्वरुपात त्यांना देशाचे प्रतिनिधीत्व करता येणार नाही. त्यामुळे हे सर्व खेळाडू रशियन ऑलिम्पिक समितीच्या नावाखाली मैदानात उतरत आहेत. 16 डिसेंबर 2022 पर्यंत रशियावरील ही बंदी कायम राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com