Icc Tournament : एका मोठ्या स्पर्धेवर बंदी घातली आहे. ओमिक्रॉनची दहशत : आयसीसीने विश्वचषक स्पर्धेचे पात्रता सामने केले रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC

ओमिक्रॉनची दहशत : आयसीसीने विश्वचषक स्पर्धेचे सामने केले रद्द

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा (Corona Virus) नवीन विषाणू ओमिक्रॉन (Omicron) आढळून आल्यानंतर सर्वच देश सतर्क झाले आहेत. हा विषाणू लवकर पसरणारा असल्याचे समजताच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या जीवघेण्या व्हायरसचा परिणाम क्रिकेटवरही (Cricket) दिसून येत आहे. कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे आयसीसीने (Icc Tournament) एका मोठ्या स्पर्धेवर बंदी घातली आहे.

आफ्रिकन देशात कोविड-१९ चा नवीन प्रकार आढळून आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हरारे येथे पुढील वर्षी होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी सुरू असलेले पात्रता सामने रद्द केले आहेत. यामुळे पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि बांगलादेश रॅंकिंगच्या आधारावर क्वालीफाई झाला आहे.

आयसीसीने निवेदनात म्हटले आहे की, स्पर्धेतील खेळाच्या अटींमध्ये नमूद केल्यानुसार संघ क्रमवारीच्या आधारे पात्रता फेरी निश्चित केली जाईल. त्यामुळे बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज आता न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरतील. श्रीलंका संघाच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्य कोविड-१९ पॉझिटिव्ह सापडला आहे.

आम्ही खूप निराश झालो

स्पर्धेचे उर्वरित सामने रद्द केल्यामुळे आम्ही खूप निराश झालो आहोत. परंतु, इतक्या कमी कालावधीत अनेक आफ्रिकन देशांमध्ये प्रवासी बंदी लागू झाल्यामुळे संघ परत येऊ शकणार नाहीत असा धोका होता, असे आयसीसी टूर्नामेंटचे प्रमुख ख्रिस टेटली म्हणाले.

चार मार्च ते तीन एप्रिलपर्यंत न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड (यजमान), पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि बांगलादेश आहेत. आयसीसी महिला चॅम्पियनशिपच्या (२०२२ ते २०२५ पर्यंत) तिसऱ्या फेरीतील संघांची संख्या आठवरून १० करण्यात आली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिजसह बांगलादेश, श्रीलंका आणि आयर्लंड असतील.