On this Day: 'सचिन' नावाचं वादळ आलं, शेन वॉर्नची उडाली होती झोप | Sachin Tendulkar News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar On This Day

On this Day: 'सचिन' नावाचं वादळ आलं, शेन वॉर्नची उडाली होती झोप

On This Day 1998: क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची गणना जगातील महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहे. पण 24 वर्षांपूर्वी 22 एप्रिल 1998 रोजी शारजाहमध्ये सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धडाकेबाज शतक झळकावले होते. क्रिकेट इतिहासात त्याची खेळी 'डेझर्ट स्टॉर्म' म्हणून प्रसिद्ध आहे. या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या सचिनने कांगारू गोलंदाजांचा समाचार घेतला.(Sachin Tendulkar On This Day)

हेही वाचा: Video : जर्सी क्रमांक 7 अन् मुंबईची सर्वात खराब कामगिरी; रोहितने पकडलं डोकं

1998 मध्ये शारजाह येथे कोका-कोला कपचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगी मालिकेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 एप्रिल रोजी मालिकेतील सहावा सामना खेळला जाणार होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 7 गडी गमावून 284 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मायकेल बेवनने नाबाद १०१ धावां केल्या तर मार्क वॉने 81 धावा केल्या. भारताकडून व्यंकटेश प्रसाद हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 2 बळी घेतले.

सचिनच्या 'डेझर्ट स्टॉर्म'च्या खेळी

ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आला तेव्हा ब्रेकच्या वेळी वादळ आले. थोड्यावेळत वादळही निघून गेले. पण नंतर सचिनने खेळलेली तुफानी खेळी आजही क्रिकेटप्रेमींच्या मनात राज्य करत आहे. डावाची सुरुवात करताना सचिनने 131 चेंडूत 143 धावांची स्फोटक खेळी खेळून ऑस्ट्रेलियन आक्रमणाचा धुव्वा उडवला. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याच्यासमोर डॅमियन फ्लेमिंग, मायकेल कॅसप्रोविक आणि शेन वॉर्नसारखे गोलंदाजांना काही करता आले नाही. सचिनच्या या खेळीला डेझर्ट स्टॉर्म असे म्हणतात.

Web Title: On This Day 1998 Sachin Tendulkar Desert Storm Came Sharjah Scored Stormy Century Against Australia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :australiaSachin Tendulkar
go to top