On This Day : फलंदाज धावबाद झाला आणि कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास घडला!

First Ever Tied Test
First Ever Tied Testesakal

क्रिकेटचा सर्वाच मोठा फॉरमॅट कसोटी क्रिकेटमध्ये जरी एक कसोटी सामना (Test Match) पाच दिवस चालत असला तरी कसोटीचा प्रत्येक दिवस काहीना काही रंजक घटना घेऊन येतो आणि कोसटी क्रिकेटची (Test Cricket) रंजकता वाढवतो. कधी कधी तर एक संघ चारही दिवस आपले वर्चस्व गाजवतो मात्र पाचव्या दिवशी दुसरा संघ आपला खेळ उंचावतो आणि दुसऱ्या संघाकडून विजयाची संधी हिरावून घेतो. (On This Day Played Out the First Ever Tied Test Between Australia and West Indies)

असा पाचव्या दिवशीपर्यंत रंगलेला आणि शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणून धरलेला ऐतिहासिक सामना १९६० मध्ये झाला होता. हा सामना आजच्याच दिवशी म्हणजे १४ डिसेंबर १९६० रोजी संपुष्टात आला आणि कसोटी क्रिकेट इतिहासाला (Test Cricket History) आपला पहिला वहिला टाय (First Ever Tied Test) सामना मिळाला.

त्यावेळचे दोन तगडे संघ ऑस्ट्रेलिया (Australia) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यामध्ये हा सामना झाला होता. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजने गॅरी सोबर्स (Garry Sobers) यांच्या दमदार १३२ धावांच्या जोरावर पहिल्या डावात ४५३ धावा उभारल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅलन डेव्हिडसन (Alan Davidson) यांनी विंडीजचा निम्मा संघ माघारी धाडला होता.

याला ऑस्ट्रेलियाने जोरदार प्रत्युत्तर देत पहिल्या डावात ५०५ धावा ठोकल्या होत्या. नोरम ओनाईल (Norm O'Neill) यांनी १८१ धावांची तुफानी खेळी केली होती. विंडीजकडून वेस हॉल (Wes Hall) यांनी १४० धावा देत ४ विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५२ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात विंडीजने २८४ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २३२ धावांची गरज होती. मात्र विंडीजने ऑस्ट्रेलियाला २३२ धावात रोखत सामना टाय केला. ऑस्ट्रेलियाचा शेवटचा फलंदाज विजयी धाव घेताना धावबाद झाला होता.

पहिल्या डावात ४ विकेट घेणाऱ्या हॉल (Wes Hall) यांनी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी धाडला होता. तर पहिल्या डावात विंडीजचा निम्मा संघ माघारी धाडणाऱ्या अॅलन डेव्हिडसन (Alan Davidson) यांनी ८० धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिची बेनाऊड यांच्याबरोबर सातव्या विकेसाठी 134 धावांची भागीदारी रचली होती. विशेष म्हणजे ही ऐतिहासिक कसोटी ब्रिसबेनच्या गाबा मैदानावर खेळली गेली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com