PAK vs AFG T20 Match: अपमानाचा बदला! अफगाणिस्तानसमोर पाकिस्तान लाचार… टी-20 मालिका जिंकून रचला इतिहास

 T20 Cricket Match News Updates
T20 Cricket Match News Updates

PAK vs AFG T20 Match : अफगाणिस्तान क्रिकेटसाठी गेले दोन दिवस स्वप्नासारखे आहेत. राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून तीन सामन्यांची मालिका जिंकली आहे.

यजमान अफगाण संघाने शारजाह येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. यासह राशिद खान अँड कंपनीने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली.

अफगाणिस्तानने याआधी पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला होता, हा त्यांचा कोणत्याही फॉरमॅटमधील पाकिस्तानवरील पहिला विजय होता.(Latest Sport News)

 T20 Cricket Match News Updates
IND vs PAK ODI News: भारत-पाकिस्तान संघात सप्टेंबरमध्ये होणार 3 वनडे! वेळापत्रकात मोठा बदल

पाकिस्तानचा कर्णधार शादाब खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज फझलक फारुकीने सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर सॅम अय्युबला झेलबाद करून पाकिस्तानची सुरुवात खराब केली. 20 धावा गाठताना पाकिस्तानने 3 विकेट गमावल्या होत्या. फारुकीने शफीकला खाते उघडू दिले नाही, तर हॅरिस 9 धावा करून बाद झाला.

 T20 Cricket Match News Updates
Team India : संजू वर्ल्ड कप खेळणार? रात्री उशिरा मिळाला न्याय! KL राहुलचे मोठे नुकसान

पाकिस्तानकडून इमाद वसीमने सर्वाधिक नाबाद 64 धावा केल्या. त्याने 57 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले. कर्णधार शादाब खान 32 धावा करून धावबाद झाला. पाकिस्तानने 6 गड्यांच्या मोबदल्यात 130 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फारुकीने सर्वाधिक 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 1 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावून 133 धावा केल्या.

 T20 Cricket Match News Updates
Team India: आधी संघातून हकालपट्टी... आता BCCIच्या करारातून बाहेर! तीन दिग्गज खेळडूची कारकीर्द संपली?

131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. रहमानउल्ला गुरबाज आणि उस्मान घनी यांनी पहिल्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी केली. घनी 7 धावा करून बाद झाला. यानंतर गुरबाजला इब्राहिम झद्रानची साथ मिळाली. दोघांनी धावसंख्या 86 धावांपर्यंत नेली. गुरबाजने 49 चेंडूत 44 धावा केल्या. झद्रान 38 धावा करून बाद झाला, तर नजीबुल्ला झदरननेही 12 चेंडूत नाबाद 23 धावा केल्या. मोहम्मद नबी 9 चेंडूत 14 धावा करून नाबाद परतला. पाकिस्तानकडून जमान खान आणि इंशानुल्ला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com