
Pakistan vs England Test : 'रावळपिंडीच्या खेळपट्टीवर 3 ते 10 वर्षांची बंदी...!' चाहते संतापले
Pakistan vs England Test : पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच घरी तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना 1 डिसेंबरपासून रावळपिंडीत खेळल्या जात आहे, त्यात फलंदाजांनी गोलंदाजांना जोरदार मुसंडी मारली आहे. या खेळपट्टीवर तीन दिवसांत हजाराहून अधिक धावा झाल्या आहेत आणि केवळ 17 विकेट पडल्या. या प्रकारची फलंदाजी पाहिल्यानंतर आता रावळपिंडीच्या खेळपट्टीबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) प्रचंड ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानचे माजी दिग्गज शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तर यांनीही पीसीबीवर जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा: FIFA World Cup 2022 : पोलंडविरुद्धच्या सामन्यात फ्रान्सचे पारडे जड
टीका होत होती तोपर्यंत ठीक होते, पण या फलंदाजीच्या खेळपट्टीवर पाकिस्तानी खेळाडूंनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे. त्यावरूनही या संघावर जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानी संघाच्या खराब खेळपट्टी आणि संथ फलंदाजीसाठी त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने सामन्याच्या पहिल्याच दिवशी 4 विकेट गमावत 506 धावा केल्या. क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे, जेव्हा एखाद्या संघाने कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने 657 धावा केल्या. यादरम्यान 4 फलंदाजांनी शतके झळकावली. मोठी गोष्ट म्हणजे कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने पहिल्या डावात 6.50 च्या धावगतीने या धावा केल्या.
हेही वाचा: Lakshya Sen : अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष सेन वयचोरीचा गुन्हा
यानंतर पाकिस्तानचा संघ फलंदाजीला आला आणि त्यांनीही शानदार फलंदाजी केली. सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 7 गड्यांच्या मोबदल्यात 499 धावा केल्या होत्या. पण दोन्ही संघांमधील सर्वात मोठा फरक रनरेटचा होता. पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध अतिशय संथ फलंदाजी केली आणि त्यांचा धावगती केवळ 3.66 होता. याबाबतही सोशल मीडिया यूजर्सनी पाकिस्तान संघावर जोरदार टीका केली आहे.
खेळपट्टीवर टीका करताना एका वापरकर्त्याने लिहिले, 'या खेळपट्टीवर 3 ते 10 वर्षांची बंदी घालण्यात यावी. आणखी एका युजरने पीसीबीकडे मागणी केली, 'कृपया मला रावळपिंडीच्या खेळपट्टीवर संधी द्या. मला 200 धावा करायच्या आहेत.