Babar Azam : 'एवढा मोठा खेळाडू अ्ण...' पत्रकाराने बाबरची सर्वांसमोर व्हिडिओ दाखवत काढली लायकी

Babar Azam News, Cricket News Marathi
Babar Azam News, Cricket News Marathi

Babar Azam Pakistan vs England Test Series : रावळपिंडी कसोटीत यजमान पाकिस्तानचा 74 धावांनी मोठा पराभव झाला. आता इंग्लंडचा संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. सपाट खेळपट्टीवर झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते आपल्या खेळाडूंबाबत निराश झाले आहेत. दरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एका पत्रकाराने पत्रकार परिषदेदरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची सर्वांसमोर व्हिडिओ दाखवत लायकी काढली.(Cricket News Marathi)

Babar Azam News, Cricket News Marathi
IND vs BAN : BCCI घेणार कठोर निर्णय! बांगलादेशविरुद्ध मालिका गमावली तर रोहितचे कर्णधारपद...

खरंतर, पाकिस्तान इंग्लंडच्या पहिल्या कसोटीनंतर बाबर आझम मीडियाशी बोलत असताना एका ज्येष्ठ पत्रकाराने त्यांना खोचक प्रश्न विचारला. त्याने विचारले, 'तुम्ही कोणत्या चेंडूवर बाद झाला ते सांगा. तुला ते कळले नाही का? म्हणजे काय झालं? कारण अशा चेंडूवर एक मोठा फलंदाज बाद झाला.

Babar Azam News, Cricket News Marathi
Umran Malik : पहिल्या सामन्यात 2 विकेट घेणाऱ्या कुलदीपऐवजी उमरान का आला संघात?

हा प्रश्न ऐकून बाबर आझमने परिपक्वता दाखवली आणि कोणतीही विशेष प्रतिक्रिया न देता शांतपणे उत्तर देत म्हणाला की, 'महाराज, हा चेंडू आहे. जर तुम्ही चुकीचे खेळाल तर तुम्ही बाद व्हाल. मी विचार करत होतो की चेंडू लांब येईल, पण तो थोडासा विकेटच्या दिशेने गेला, त्यामुळे तिथे एक अंतर निर्माण झाले.

Babar Azam News, Cricket News Marathi
Mirabai Chanu : जिगरबाज मीरा! दुखणाऱ्या मनग टाने उचलले 200 किलो वजन

पाकिस्तानी कर्णधार जरी आपल्या संघासाठी हा सामना जिंकू शकला नाही, परंतु त्याने पहिल्या डावात यजमानांना चांगलेच अडचणीत आणले होते. बाबरने आपल्या डावात 168 चेंडूत 19 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने एकूण 136 धावा केल्या. त्याला विल जॅकने बाद केले. दुसऱ्या डावात बाबर अवघ्या 4 धावांवर बाद झाला आणि त्याची विकेट इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com