PAK vs ENG Test Series: पाकिस्तानसाठी वाईट बातमी! ICC ने रावळपिंडीच्या खेळपट्टीवर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PAK vs ENG Test Series

PAK vs ENG Test Series: पाकिस्तानसाठी वाईट बातमी! ICC ने रावळपिंडीच्या खेळपट्टीवर...

Pakistan vs England Test Series : इंग्लंडने 22 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. इंग्लंडने रावळपिंडीनंतर मुलतान कसोटीतही रोमहर्षक विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. रावळपिंडी कसोटीच्या खेळपट्टीवरून बराच वाद झाला. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने रावळपिंडीतील खेळपट्ट्यांबाबत आपला निर्णय दिला आहे.

आयसीसीने या खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी म्हटले आहे. रावळपिंडीच्या खेळपट्टीवर गोलंदाजांसाठी फारसे काही नव्हते आणि इंग्लंडने तो 74 धावांनी जिंकला. रावळपिंडी कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी फक्त गोलंदाजांना खेळपट्टीवरून थोडीफार मदत मिळाली, उर्वरित दिवस फलंदाजांसाठी धावा काढणे खूप सोपे होते.

हेही वाचा: David Warner: 'तो तर म्हातारा... बंदी उठवून काय करणार'! वॉर्नरला दिग्गज चॅपेलनी लगावला टोला

रावळपिंडी कसोटीदरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनीही याला लज्जास्पद म्हटले होते. मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतरही रावळपिंडीची खेळपट्टी सरासरीपेक्षा कमी होती. एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरी एंडी पाइक्रॉफ्ट म्हणाले की, 'ही एक अतिशय सपाट विकेट होती, जी कोणत्याही प्रकारच्या गोलंदाजाला मदत करत नव्हती. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी त्यावर वेगवान धावा केल्या हे एक मोठे कारण होते.

हेही वाचा: Virat Kohli : पहिल्या कसोटीत रूट, स्मिथसह द्रविडही असेल किंग कोहलीच्या रडारवर

ते पुढे म्हणाला, 'या खेळपट्टीवरून गोलंदाजांना मदत मिळत नव्हती, त्यामुळे आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मी ही खेळपट्टी सरासरीपेक्षा कमी मानतो.' रावळपिंडीची खेळपट्टी सलग दोनदा सरासरीपेक्षा कमी घोषित करण्यात आली आहे आणि जर असे पुन्हा घडले, तर त्यावर सुमारे एक वर्ष कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्यास बंदी घातली जाऊ शकते.