Asia Cup : कोण आहे 'ती' मिस्ट्री गर्ल? तिच्यासाठी भारतीय प्रेक्षकांनी संपूर्ण सामना पाहिला

रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका मिस्ट्री गर्लचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
pak vs sl asia cup 2022
pak vs sl asia cup 2022sakal

Asia Cup 2022 Final : आशिया कप 2022 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून पाकिस्तानला 23 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे भारतीय चाहत्यांची निराशा झाली. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका मिस्ट्री गर्लचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच चाहत्यांनी लिहिले आहे की, हा संपूर्ण अंतिम सामना या मिस्ट्री गर्लमुळे पाहिला.

pak vs sl asia cup 2022
Asia Cup 2022 : दुबईतील IPL चा फायदा; चॅम्पियन झाल्यावर कर्णधारने व्यक्त केले मत

या मिस्ट्री गर्लची व्हिडिओ क्लिप इतकी क्यूट होती की सोशल मीडियावर प्रंचड शेअर केल्या जात आहे. उर्वशी रौतेलानेही आशिया कपच्या सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये पोहोचून ग्लॅमर वाढवले. नसीम शाहसोबतचा त्याचा एक व्हिडिओही चाहत्यांनी एडिट करून व्हायरल केला. आता ही मिस्ट्री गर्लही व्हायरल होत आहे. मात्र ही मुलगी कोण आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

pak vs sl asia cup 2022
Asia Cup 2022 : दुबईतील IPL चा फायदा; चॅम्पियन झाल्यावर कर्णधारने व्यक्त केले मत

श्रीलंकेच्या संघाने सहाव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ 147 धावा करू शकला. फायनलमध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम श्रीलंंकेला फलंदाजीला पाचारण केले. मात्र पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेची अवस्था 5 बाद 58 अशी झाली. मात्र त्यानंतर वानुंदू हसरंगा आणि भानुका राजापक्षेने आक्रमक फलंदाजी करत श्रीलंकेला 150 धावांच्या पार पोहचवले. हसरंगाने 21 चेंडूत आक्रमक 36 धावा केल्या. तर भानुका राजापक्षेने 45 चेंडूत नाबाद 71 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी कले. त्याच्या या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानसमोर 171 धावांचे आव्हान ठेवले. धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांच्या खेळात 147 धावांवर सर्वबाद झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com