PAK vs SL Asia Cup Final: लंकेला सहाव्यांदा तर पाकला तिसऱ्यांदा 'चॅम्पियन' बनायचे संधी

आशिया करंडक खरे तर श्रीलंकेत होणार होता देशातील परिस्थिती नाजूक असल्याने स्पर्धा दुबईला हलवली गेली तरीही...
PAK vs SL Asia Cup cricket final match
PAK vs SL Asia Cup cricket final match

PAK vs SL Asia Cup Final : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेची रंगीत तालीम जिंकणारा श्रीलंकेचा संघ आता विजेतेपदाचे महानाट्य जिंकणार का, या प्रश्नाचे उत्तर आज होणाऱ्या अंतिम सामन्यातून मिळणार आहे. पाकचा संघ उजवा असला तरी शुक्रवारी सुपर-४ सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे श्रीलंकेचा आत्मविश्वास दुणावला आहे आणि तीच त्यांची जमेची बाजू ठरणार आहे. या स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सुपर-४ मधील साखळी सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला लीलया हरविले. पाकचा गढ कसा भेदता येऊ शकतो याचे सूत्र त्यांना मिळाले आहे. आता वेळ सातत्य राखण्याची आहे.

श्रीलंकेचे सलग चार विजय

आशिया करंडक खरे तर श्रीलंकेत होणार होता. देशातील परिस्थिती नाजूक असल्याने स्पर्धा दुबईला हलवली गेली. तरीही कागदावर यजमान म्हणून श्रीलंकन बोर्डाचे नाव होते. त्यातून स्पर्धा चालू झाल्यावर पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकन संघाला मोठ्या पराभवाचा दणका दिला. साखळी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने कसाबसा विजय मिळवला आणि आव्हान कायम ठेवले. नंतर अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तानला पराभूत करून श्रीलंकेने सलग चार विजय मिळवले आहेत.

बाबरच्या फॉर्मची चिंता

खेळाडूंचे बलाबल बघितले तर पाकिस्तानचा संघ उजवा वाटतो. कप्तान बाबर आझम चांगल्या लयीत नाही आणि पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज खूप अचूक मारा करत नाहीत, ही त्यांची कमकुवत बाजू आहे. दुसऱ्या बाजूला श्रीलंकन संघाने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर खूप सकारात्मक आणि सुधारित खेळ केला आहे. दसून शनाकाच्या शतकाने आपल्या संघाला योग्य मार्ग दाखवला आहे. श्रीलंकन फलंदाजांनी

नाणेफेक महत्त्वाचीच

कोणी काहीही म्हटले तरी दुबई स्टेडियमवर होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेकीला महत्त्व राहिले आहे. गतवर्षी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेपासून ते आत्तापर्यंत दोन मोठे संघ खेळत असताना नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करणारे संघच विजयी झाले आहेत, हे सत्य आहे. म्हणूनच दोन्ही संघांचे कप्तान सामन्याअगोदर काहीही म्हणत असले तरी नाणेफेक जिंकायची मनोमन इच्छा बाबर आणि शनाकाच्या मनात पिंगा घालत असणार. दुबईच्या खेळपट्टीवरच सामना चालू होत असतानाचा ताजेपणा जेमतेम अर्धा ते पाऊण तास टिकतो, ज्याचा फायदा वेगवान गोलंदाज घेतात, असे दिसून आले आहे.

तिकिटांची मागणी रोडावली

भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर गेला असल्याने अंतिम सामन्याच्या तिकिटांसाठी मागणी कमी झाली. तरीही सामना रंगतदार होण्याच्या अपेक्षेने अगदी शेवटच्या क्षणी चाहते उरलेली तिकिटे विकत घेऊन स्टेडियम भरून टाकतील, असा संयोजकांचा अंदाज आहे, परंतु रविवारी हा येथे सुट्टीचा दिवस नसल्यमुळे किती प्रेक्षक येतील याबाबतही शंका व्यक्त करण्यात येत आहे.

पुष्कर जोग क्रिकेटचा अपमान करणार नाही

भारत वि. पाकिस्तान असाच अंतिम सामना होईल, असे गृहीत धरून कित्येक भारतीय क्रिकेटप्रेमी लोकांनी रविवारच्या सामन्यासाठी दुबईला येण्याचा घाट घातला. भारतीय संघाने अपेक्षित कामगिरी केली नाही आणि अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंकन संघ येऊन दाखल झाल्याने बऱ्याच भारतीय फॅन्सच्या योजनांना सुरुंग लागला. खूप चाहत्यांनी दुबईला येण्याचा विचार रद्द केला. मराठी सिनेमाचा हिरो पुष्कर जोगने दुबईला येऊन अंतिम सामन्याचा आनंद घेण्याचा विचार बदलला नाही. ‘मी खरा क्रिकेट चाहता आहे... मला अंतिम सामना प्रत्यक्ष मैदानावर येऊन बघायचा होता... भारतीय संघ अंतिम सामन्यात नसल्याचे दुःख आहे... पण मी क्रिकेटचा अपमान नाही करणार... ठरल्याप्रमाणे मी दुबईला आलो आहे आणि रविवारीचा अंतिम सामना बघणार आहे’, असे क्रिकेटप्रेमी पुष्कर जोगने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com