Babar Azam : लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधार बाबरने कोणाच्या माथी फोडले पराभवाचे खापर

Babar Azam
Babar Azam esakal

Babar Azam on Afghanistan after first ever defeat : एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानचा पराभव केला. अफगाणिस्तानने वर्ल्ड कप मध्ये दोन सामने जिंकण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. या पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम नाराज दिसला. त्याने आपल्या गोलंदाजांना जोरदार फटकारले.

Babar Azam
Points Table मध्ये मोठी उलथापालथ! अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत करून इतिहास रचला, विश्वविजेता संघ तळात

बाबर आझमने पराभवासाठी आपल्या गोलंदाजांना जबाबदार धरले जे मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यात अपयशी ठरले. सोमवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 282 धावा केल्या. यानंतर अफगाणिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे त्यांनी 49 षटकांत 2 बाद 286 धावा करून विजय मिळवला.

सामन्यानंतर बाबर म्हणाला, “आम्ही चांगली धावसंख्या केली होती पण गोलंदाजीत आमची कामगिरी चांगली केली नाही. कारण मधल्या षटकांमध्ये आम्हाला विकेट घेता आली नाही. वर्ल्ड कपमध्ये एका जरी विभागात चांगली कामगिरी झाली नाही तर पराभवाला सामोरे जावे लागते.

तो म्हणाला, 'आम्ही गोलंदाजीत चांगली सुरुवात केली पण आम्हाला विकेट घेता आली नाही. या विजयाचे संपूर्ण श्रेय अफगाणिस्तानला जाते. आम्ही चांगले क्रिकेट खेळत नाही, विशेषतः गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आमची कामगिरी चांगली नाही. दुसऱ्या डावातही खेळपट्टीवरून फिरकीपटूंना मदत मिळत होती मात्र अफगाणिस्तानच्या फलंदाजांवर कोणतेही दडपण नव्हते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com