VIDEO Babar Azam : बाबर आझमचा इंग्रजीने केला घात! सोशल मीडियावर होतोय तुफान ट्रोल

Pakistan Captain Babar Azam Called Netherlands Scotland Poor English Knowledge Trolled After 3rd ODI against Netherland
Pakistan Captain Babar Azam Called Netherlands Scotland Poor English Knowledge Trolled After 3rd ODI against Netherlandesakal

Babar Azam Pak vs Ned : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आशिया कपमध्ये 28 ऑगस्टला भिडणार आहे. त्यापूर्वी पाकिस्तानचा संघ नेदरलँडच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यावर पाकिस्तान तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळत आहे. दरम्यान, तिसऱ्या वनडे सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने असे काही वक्तव्य केले त्यामुळे तो तुफान ट्रोल होत आहे. (Pakistan Captain Babar Azam Called Netherlands Scotland)

Pakistan Captain Babar Azam Called Netherlands Scotland Poor English Knowledge Trolled After 3rd ODI against Netherland
Asia Cup 2022 : पाकिस्तानविरूद्ध अशी असेल भारताची प्लेईंग इलेव्हन

बाबर आझम पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलत होता. त्यावेळी त्याला त्याच्या संघाच्या कामगिरीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने 'आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. मी त्यांच्या कामगिरीवर खूष आहे. दुसऱ्या डावात आमच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. आम्ही या सामन्यात बेंच स्ट्रेंथ चाचपून पाहिली. सुरूवातीला बॉल चांगल्या प्रकारे बॅटवर येत नव्हता. आम्ही थोड्या कमी धावा केल्या. याचं श्रेय स्कॉटलँडच्या गोलंदाजांना जाते. त्यांनी चांगली गोलंदाजी केली.' अशी प्रतिक्रिया दिली.

Pakistan Captain Babar Azam Called Netherlands Scotland Poor English Knowledge Trolled After 3rd ODI against Netherland
VIDEO | Shubman Gill : पहिल्या शतकानंतर गिलचे भन्नाट सेलिब्रेशन होतंय व्हायरल

मात्र यावेळी बाबर आझम इंग्रजी बोलताना देखील अडखळत होता. तसेच त्याने नेदरलँडचा उल्लेख स्कॉटलँड असा केला. सध्या बाबर आझमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्यावर अनेक मीम्स देखील तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने नेदरलँड विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 49.4 षटकात सर्वबाद 206 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात नेदरलँडला फक्त 197 धावा करता आल्या. पाकिस्तानने सामना 9 धावांनी जिंकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com