पोट सुटलंय तर दंड भरा; क्रिकेट बोर्डाची कारवाई

वृत्तसंस्था
शनिवार, 4 जानेवारी 2020

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सहा आणि सात जानेवारीला फिटनेस टेस्ट घेतली जाईल. ही चाचणी पाकिस्तानचे सामर्थ्य आणि कंडिशनिंग प्रशिक्षक यासिर मलिक खेळाडूंची चाचणी घेतील. या चाचणीत लठ्ठपणा, सामर्थ्य, सहनशक्ती, वेग आणि क्रॉस फिट अशा पाच गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल.

इस्लामाबाद : क्रिकेटमध्ये आता कौशल्याएवढेच महत्व फिटनेसला दिले आहे. त्यामुळे आता प्रत्येक क्रिकेट संघटना संघातील खेळाडूंच्या फिटनेसकडे बारकाईने लक्ष देते. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पोट सुटलेल्या क्रिकेटपटूंकडून आता दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पोट सुटलेल्या खेळाडूंना फिटनेस टेस्टमध्येसुद्धा पास करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. ज्या खेळाडूंचे पोट सुटले आहे त्यांना फिटनेस टेस्टमध्ये पास केले जाणार नाही त्याचबरोबर त्यांच्याकडून दंडही आकारला जाईल, असे पीसीबीने स्पष्ट केले आहे. 

''राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सहा आणि सात जानेवारीला फिटनेस टेस्ट घेतली जाईल. ही चाचणी पाकिस्तानचे सामर्थ्य आणि कंडिशनिंग प्रशिक्षक यासिर मलिक खेळाडूंची चाचणी घेतील. या चाचणीत लठ्ठपणा, सामर्थ्य, सहनशक्ती, वेग आणि क्रॉस फिट अशा पाच गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल. जे खेळाडू किमान फिटनेसदेखील सिद्ध करु शकणार नाही त्यांच्या मानसिक वेतनाच्या 15 टक्के दंड आकारला जाईल. तंदुरुस्ती सिद्ध करेपर्यंत त्यांच्याकजून हा दंड स्वीकारला जाईल,'' असे पीसीबीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Cricket Board to fine players below far fitness