किवींना सुरक्षा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी खाल्ली 27 लाखांची बिर्याणी

आधीच घाट्याचा सौदा त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ही वाढीव रक्कम देखील भरावी लागणार
PAK vs NZ
PAK vs NZ

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. आधी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आयत्यावेळी दौरा रद्द केला. त्यानंतर इंग्लंडने पाकिस्तानमध्ये येऊन खेळण्यास नकार दिला आहे. या दोन्ही देशांसोबतच्या द्विपक्षीय मालिकेतून पाकिस्तानला मोठी कमाई होणार होती. पण सुरक्षिततेच्या कारणास्ताव दोन्ही संघांनी पाकिस्तान दौरा रद्द केल्यामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. यात आणखी एक भर पडली आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघाला सुरक्षा देण्यासाठी पाकिस्ताने जी व्यवस्था केली होती. यासाठीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. बहुतांश अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कामावेळी बिर्याणीवर ताव मारल्याचे समोर आले आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या जेवणाचे तब्बल 27 लाख बिल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भरावे लागणार आहे.

PAK vs NZ
पंजाबच्या खेळाडूची 'ती' पोस्ट म्हणजे मॅच फिक्सिंगचा सिग्नल?

इस्लामाबाद आणि रावळपिंडी येथे न्यूझीलंड संघाला सुरक्षा पुरवण्यासाठी पाकिस्तान बोर्डाने लष्करासह 5 पोलिस अधीक्षक आणि 500 हून अधिक फौज फाटा तैनात केला होता. पाकिस्तान दौऱ्यावर पोहचल्यानंतर न्यूझीलंडचा संघ इस्लामाबाद येथील सेरेना हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. एका वृत्तानुसार, सुरक्षिततेसाठी तैनात अधिकाऱ्यांनी दिवसातून दोन वेळा बिर्याणी ऑर्डर केली होती. याचे बिल जवळपास 27 लाख रुपये आले आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला हे पैसे भागवावे लागणार आहेत.

PAK vs NZ
IPL 2021 : मँचेस्टर प्रमाणे मॅच रद्द होणार नाही; इंग्लिश मॅनचा BCCI ला टोला

जवळपास 8 दिवस कर्मचारी न्यूझीलंड संघाला सुरक्षा पुरवण्यासाठी तैनात होते. कर्मचाऱ्यांच्या बिर्याणीवर ताव मारल्याचे बिल ज्यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अर्थ विभागाकडे मंजूरीला आले त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एवढे बिल कसे आले? याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. किवी खेळाडूंच्या सुरक्षेसाठी फ्रंटियर कॉन्सटेबुलरी जवानही तैनात होते. यांच्या खानपानाचं बिल अद्याप यायचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com