
‘पाक’चे झहीर अब्बास ‘आयसीयू’त
लंडन: पाकिस्तानचे (Pakistan) माजी दिग्गज क्रिकेटपटू (Cricketer) झहीर अब्बास (Zaheer Abbas) यांना गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची (Corona) लागण झाली होती, त्यानंतर आता त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आहे. स्थानिक वृत्तवाहिनीनुसार, ७४ वर्षीय झहीर अब्बास यांना पॅडिंग्टन येथील सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तीन दिवसांनंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना आता आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. झहीर अब्बास हे पाकिस्तानच्या महान फलंदाजांपैकी एक आहेत. कोरोनानंतर तपासणीत त्यांच्यात न्यूमोनियाचीही लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे ते सध्या डायलिसिसवर आहेत.
झहीर अब्बास यांनी ऑक्टोबर १९६९ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ७८ कसोटीत ४४.८ च्या सरासरीने ५०६२ धावा केल्या आहेत. ज्यात १२ शतकांचा समावेश आहे, यामध्ये चार द्विशतकांचाही समावेश आहे. याशिवाय झहीर अब्बास यांच्या नावावर २० अर्धशतकेही आहेत. तसेच झहीर यांनी ऑगस्ट १९७४ मध्ये ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना पाकिस्तानसाठी ६२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७.६३ च्या सरासरीने २५७२ धावा केल्या. यामध्ये सात शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. झहीर यांनी ऑक्टोबर १९८५ मध्ये शेवटची कसोटी आणि नोव्हेंबर १९८५ मध्ये शेवटची वनडे खेळलेली आहे.
सामनाधिकारी म्हणूनही काम
आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत झहीर यांनी ४५९ सामन्यांमध्ये १०८ शतके आणि १५८ अर्धशतकांसह ३४,८४३ धावा केल्या आहेत.क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी सामनाधिकारी म्हणूनही काम केले.
Web Title: Pakistan Cricket Legend Zaheer Abbas In Icu London Hospital Corona Patient London
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..