Muhammad Rizwan Odisha Train Accident : मानवी जीवांच नुकसान होणं... रिझवानचं भारतातील रेल्वे अपघातावर ट्विट

Muhammad Rizwan Odisha Train Accident
Muhammad Rizwan Odisha Train Accident esakal
Updated on

Muhammad Rizwan Odisha Train Accident : पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने ओडिसा येथे झालेल्या रेल्वे अपघातावर ट्विट करत मृत्यू झालेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे. ओडिसा राज्यातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात झाला होता. यात जवळपास 275 प्रवाशांचा मृत्यू तर जवळपास 1000 प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातात बंगळुरू - हावडा सुपर फास्ट एक्सप्रेस, शालीमार - चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या गाड्या एकमेकांवर आदळल्या होत्या.

Muhammad Rizwan Odisha Train Accident
Lucknow Ekana Stadium : लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये मोठी दुर्घटना!

अपघातानंतर पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानने ट्विट केले. तो आपल्या ट्विट मध्ये म्हणतो की, 'मानवी जीवांच नुकसान होणं हे कायम वेदनादायी असतं. भारतात रेल्वे अपघातात प्रभावित झालेल्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो.'

Muhammad Rizwan Odisha Train Accident
Bajrang Punia Wrestler Protest : आयुष्य पणाला लागलंय नोकरीचं काय... अफवांचा बाजार गरम असताना बजरंगचे ट्विट

रविवारी सकाळी भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने रेल्वे अपघातात आपले पालक गमावलेल्या मुलांसाठी त्याची शाळा मोफत बोर्डिंग उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. विराट कोहली आणि ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यासह अनेक खेळाडूंनी रेल्वे अपघातावर आपल्या सहवेदना व्यक्त केल्या होत्या.

भूवनेश्वरमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की 200 रूग्णवाहिका, 50 बस आणि 45 मोबाईल हेल्थ युनिट सध्या अपघात झालेल्या ठिकाणी कार्यरत आहेत. याचबरोबर 12000 लोकं देखील तेथे दिवस रात्र काम करत आहेत. मृतदेह हे सगळ्या प्रकारच्या वाहनातून रूग्णालयात नेण्यात येत आहेत. यात ट्रॅक्टरचा देखील समावेश आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com