विराट कोहलीने 200 शतकं ठोकली तरी... पाकिस्तानचा माजी खेळाडू वक्तव्य करून आला चर्चेत | Virat Kohli Sachin Tendulkar Rashid Latif | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli  Sachin Tendulkar Rashid Latif

Virat Kohli : विराट कोहलीने 200 शतकं ठोकली तरी... पाकिस्तानचा माजी खेळाडू वक्तव्य करून आला चर्चेत

Virat Kohli Sachin Tendulkar Rashid Latif : भारताची रनमशीन विराट कोहलीने बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात आपले 72 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. त्याने रिकी पॉटिंगचे रेकॉर्ड मागे टाकले असून आता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या यादीत त्याचा पुढे सचिन तेंडुलकर आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू राशिद लतिफ यांना विराट कोहली सचिन तेंडुलकरचे शतकांच्या शतकाचे रकॉर्ड मोडणार हा याबाबत एका यूट्यूब चॅनवर प्रश्न विचारण्यात आला. लतिफ यांनी दिलेल्या उत्तरामुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

हेही वाचा: IND v BAN: कसोटी सामन्याची वेळ बदलली; टीव्ही अन् मोबाईलवर अशाप्रकारे सामने पहा थेट

राशिद लतिफ यांना यूट्यूब चॅनवरील एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला. विराट कोहली सचिनचे 100 आंतरराष्ट्रीय शतकांचे रेकॉर्ड मोडू शकतो का असा तो प्रश्न होता. त्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, 'मला वाटते की चाहते त्याच्या 100 शतकांचे रेकॉर्ड तोडण्याची नाही तर भारतीय संघ कधी आयसीसी ट्रॉफी जिंकतो याची वाट पाहत आहेत.'

राशिद पुढे म्हणाले की, 'शतकांची संख्या मोजण्याची ही योग्य वेळ नाही. सध्या याला काही अर्थ नाहीये. भारताच्या दृष्टीने आयसीसी ट्रॉफी जिंकणे जास्त महत्वाचे आहे. भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकून बरेच वर्ष झाली. विराट कोहली 200 शतकं का पूर्ण करेना! त्याला आयसीसी ट्रॉफी जिंकणे गरजेचे आहे.'

हेही वाचा: Ind vs Ban Test: BCCI ऋषभ पंतचे पंख छाटतय; ODI झालं आता कसोटीतही टांगती तलवार?

बीसीसीआच्या श्रीमंतपणावर बोट ठेवत राशिद लतिफ म्हणाले की, 'भारतीय चाहत्यांसाठी आयसीसी ट्रॉफी जास्त महत्वाची आहे. आयपीएलमुळे भारतीय क्रिकेट खूप पुढे गेलं आहे. मात्र आता चाहते आणि माध्यमांचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी दबाव वाढत आहे. विराट कोहली 100 शतके का ठोकेना आता चाहत्यांची मागणी बदलली आहे. आशिया कप हातातून गेला. चॅम्पियन्स ट्रॉफी देखील गेली, 2019 चा वर्ल्डकप आता टी 20 वर्ल्डकप... शंभर शतकांचे एक वेगळे स्थान आहे. मात्र भारताला आणि बीसीसीआयला आयसीसी ट्रॉफी जिंकणे खूप गरजेचे आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?