esakal | क्रीडा जगतात खळबळ! पाकचा फुटबॉलपटू आफ्रिदीची गोळ्या घालून हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

gun

पाकमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दोन गटांमध्ये आधीच्या वादातून गोळीबार झाला. आफ्रीदी त्याच्या मित्रांसह सामना पाहण्यासाठी गेला असताना ही घटना घडली.

क्रीडा जगतात खळबळ! पाकचा फुटबॉलपटू आफ्रिदीची गोळ्या घालून हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद - पाकिस्तानचा फुटबॉलपटू जुनैद आफ्रिदी याची ह्त्या झाल्यानं क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दोन गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात फुटबॉलपटू आफ्रिदीचा मृत्यू झाला. पाकिस्तानातील खैबर जिल्ह्यातील जमरूद इथं ही घटना घडली. जुनैद पाकिस्तानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघातील स्टार खेळाडू होता. 

पाकमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दोन गटांमध्ये आधीच्या वादातून गोळीबार झाला. आफ्रीदी त्याच्या मित्रांसह सामना पाहण्यासाठी गेला असताना ही घटना घडली. यात जुनैदला गोळी लागली आणि तो जागीच गतप्राण झाला. या गोळीबारात आणखी एका खेळाडूचा मृत्यू झाल्याचंही म्हटलं जात आहे. तसंच आफ्रिदीचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. 

फुटबॉल पाकिस्तानने जुनैदच्या हत्येनंतर शोक व्यक्त केला आहे. जुनैद केपी सर्कलमधील स्टार फुटबॉलपटू होता. यंग जमरूद फुटबॉल क्लबकडून तो खेळला होता. फूटबॉल सामना पाहत असतानाच जुनैदच्या भावाचा काही लोकांशी वाद सुरु झाला.

काही दिवसांपूर्वी त्याच्या भावाला लुटलं होतं. त्यातून पुन्हा एकदा वाद झाला आणि ही धक्कादायक घटना घडली असं पाकिस्तान फुटबॉलने ट्विट केलं आहे