ICC Men's ODI Team Rankings : पाकिस्तानने भारताला केले 'ओव्हरटेक' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Overtake India Climb 4th Spot in ICC Men's ODI Team Rankings

ICC Men's ODI Team Rankings : पाकिस्तानने भारताला केले 'ओव्हरटेक'

दुबई : आयसीसीने पुरूष एकदिवसीय संघांचे रँकिंग जाहीर केले आहे. मायदेशात वेस्ट इंडीजला 3 - 0 असे लावळणाऱ्या पाकिस्तानने भारताला ओव्हरटेक करून चौथे स्थान गाठवले. तर न्यूझीलंडचा संघ 125 गुण घेऊन वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याच्या खालोखाल इंग्लंड 124 गुण घेऊन दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया 107 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. (Pakistan Overtake India Climb 4th Spot in ICC Men's ODI Team Rankings)

हेही वाचा: कार्तिकला वगळून पटेलला बढती.. स्मिथ, गावसकरांनी पंतचे पिळले कान!

पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील मालिका सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान आयसीसी वनडे रँकिंगमध्ये 102 गुण घेऊन पाचव्या स्थानावर होता. भारत गेल्या काही काळापासून वनडे मालिका खेळलेला नाही. विंडीज विरूद्धच भारताने काही महिन्यांपूर्वी मालिका खेळली होती.

हेही वाचा: T20 World Cup : गंभीरच्या 'टॉप ऑर्डर'मध्ये नाहीत राहुल, विराट

मात्र पाकिस्तानने वेस्ट इंडीजला 3 - 0 असा व्हाईट वॉश दिल्याने पाकिस्तानने 106 गुण मिळवत चौथ्या स्थानी झेप घतेली. 105 गुण घेतलेला भारत आता पाचव्या स्थानावर गेला आहे. मात्र भारताला आपले गेलेले चौथे स्थान परत मिळवण्याची संधी आहे. भारत इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्याविरूद्ध प्रत्येकी तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका पाकिस्तानची पुढची ऑगस्टमधील वनडे मालिकेपूर्वी होणार आहे.

Web Title: Pakistan Overtake India Climb 4th Spot In Icc Mens Odi Team Rankings

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top