पाक-श्रीलंका मालिका अमिरातीत?

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

श्रीलंकेच्या दहा अव्वल खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर अन्य दहा खेळाडूंनीही याबाबतचा निर्णय श्रीलंका मंडळास कळवल्याचे वृत्त गल्फ न्यूजने दिले आहे. त्यामुळे ही मालिका अमिरातीत खेळवण्याबाबत विचार होत आहे.

दोहा : श्रीलंकेच्या दहा अव्वल खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर अन्य दहा खेळाडूंनीही याबाबतचा निर्णय श्रीलंका मंडळास कळवल्याचे वृत्त गल्फ न्यूजने दिले आहे.

पाकिस्त्यातानात खेळण्यास नकार देत असलेल्या श्रीलंका खेळाडूंच्या संख्येत सतत वाढ होत असल्यामुळे ही मालिका अमिरातीत खेळवण्याबाबत विचार होत आहे. पाकिस्तान आपल्या मालिका यापूर्वीही अमीरातीत खेळले आहेत. 

पाक-श्रीलंका मालिकेतील तीन एकदिवसीय लढती कराचीत; तर तीन ट्‌वेंटी 20 लढती लाहोरला घेण्याचे ठरले आहे. कराची जास्त असुरक्षित मानले जात आहे, त्यामुळे दौऱ्यास श्रीलंका खेळाडूंचा विरोध असल्याचीही चर्चा आहे.

पाक मंडळाचे प्रमुख एहसान मणी यांनी मात्र ही मालिका पूर्वघोषित कार्यक्रमानुसार होणार असल्याचा दावा केला. संघनिवड हा श्रीलंका मंडळाचा प्रश्न आहे, आमचा नाही, असे सांगत त्यांनी श्रीलंकेच्या अव्वल खेळाडूंच्या माघारीबाबतचा प्रश्न टाळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan - Sri Lanka series may be held in UAE