
नवी दिल्ली : पाकिस्तानचा हॉकी संघ आशियाई करंडक व ज्युनियर हॉकी विश्वकरंडकात सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांकडून याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले की, आशियाई करंडक व ज्युनियर विश्वकरंडक यामध्ये सहभागी होण्यापासून पाकिस्तानला आम्ही रोखू शकत नाही.