रावळपिंडी खेळपट्टीवरून पाकची फजिती; ICC च्या रेटिंगकडे लक्ष | Pakistan vs Australia Rawalpindi Batting Pitch | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan vs Australia Rawalpindi Batting Pitch

रावळपिंडी खेळपट्टीवरून पाकची फजिती; ICC च्या रेटिंगकडे लक्ष

ऑस्ट्रेलिया तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तान दौरा करत आहे. या दौऱ्यावर काही दर्जेदार कामगिरी पहावयास मिळेल असे वाटत होते. मात्र रावळपिंडी (Rawalpindi Pitch) येथे खेळल्या गेलेल्या पहिल्याच कसोटीत खेळपट्टीने (Test Pitch) सगळ्यांची निराशा केली. या खेळपट्टीवर क्रिकेट जाणकार आणि चाहत्यांनी सडकून टीका केली आहे. काहींनी तर ही खेळपट्टीची तुलना हायवेशी केली. या खेळपट्टीवर 5 दिवसात फक्त 14 विकेट पडल्या तर तब्बल 1187 धावांचा डोंगर उभा राहिला.

हेही वाचा: मंकडिंगच्या नियमात होणार बदल; चेंडूला लाळ लावणे कायमचे बॅन?

पाकिस्तान - ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील पहिल्या रावळपिंडी कसोटीची खेळपट्टी ही फलंदाजांना अत्यंत पोषक (Batting Pitch) अशी बनवण्यात आली होती. या खेळपट्टीबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) म्हणाला, या खेळपट्टीबाबत निर्णय घेण्याचे काम मी चाहते आणि समालोचकांवर सोपवतो. प्रत्येक जण बॅट आणि बॉल मध्ये एक स्पर्धा पाहण्यासाठी येत असतो. कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) अशी स्पर्धा सर्वात सुंदर आहे. ज्यावेळी सामना कोणत्याही निकालाशिवाय संपला त्यावेळी पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद 252 धावा केल्या होत्या. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 4 बाद 476 धावा करून डाव घोषित केला होता.

हेही वाचा: बिजिंग पॅरालिंम्पिकमध्ये युद्धग्रस्त युक्रेनची दणक्यात पदकांची कमाई

सामन्यात फलंदाजांचा दबदबा होता. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक आणि अब्दुल्ला शफीक या दोघांनीही दोन्ही डावात. शतके ठोकली. ही जोडी ऑस्ट्रेलियाविरूद्ध दोन्ही डावात शतक ठोकणारी पहिली जोडी ठरली. दरम्यान, आता या रावळपिंडीच्या खेळपट्टीबाबत आयसीसी कोणता निर्णय घेणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ही खेळपट्टी खराब होती हे मान्य करायला तयार नाही. ऑस्ट्रेलिया 1998 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेली आहे. या दौऱ्यातील दुसरा सामना शनिवारपासून कराची येथे सुरू होत आहे.

Web Title: Pakistan Vs Australia Rawalpindi Batting Pitch Icc Rating Awaiting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top