PAK vs NEP Asia Cup 2023 : हलक्यात नाही घ्यायचं! नवख्या नेपाळची बाप फिल्डिंग, मोहम्मद रिझवान तर...

Pakistan Vs Nepal Latest News
Pakistan Vs Nepal Latest Newsesakal

PAK vs NEP Asia Cup 2023 : आशिया कप 2023 मधील पहिला सामना हा यजमान पाकिस्तान आणि नवख्या नेपाळ यांच्यात मुल्तान येथे होत आहे. नेपाळचा हा पहिलाच आशिया कपचा सामना आहे. ते प्रथमच आशिया कपसाठी पात्र झाले आहे. मात्र पहिल्याच सामन्यात नेपाळने पाकिस्तानच्या संघाला त्यांच्यात मायदेशात चांगलाच घाम फोडला.

मुल्तानमध्ये आज जवळपास 40 डिग्री सेल्सियस तापमान असण्याची शक्यता आहे. अशा तापलेल्या वातावरणात नेपाळला भर दुपारी फिल्डिंग करावी लागली. मात्र जरी नेपाळ फिल्डिंग करत असला तरी घाम मात्र पाकिस्तानला फुटला. कारण नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला नेपाळने पहिल्या सहा षटकात दोन धक्के दिले. (Pakistan Vs Nepal Asia Cup 2023 Latest News)

Pakistan Vs Nepal Latest News
Asia Cup 2023 : कपाळावर टिकली अन् हातात बांगड्या... पारंपरिक पेहरावात त्रिशलाने गाजवला Opening Ceremony

नेपाळच्या करण केसीने सलामीवीर फकर जमानला 14 धावांवर बाद केले तर रोहित पौडेलने दुसरा सलामीवीर इमाम - उल - हकला 5 धावांवर धावबाद केले. यामुळे पाकिस्तानची अवस्था 6.1 षटकात 2 बाद 25 धावा अशी झाली. यानंतर अनुभवी जोडी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी रचली.

Pakistan Vs Nepal Latest News
Asia Cup 2023 IND vs PAK : 10 सेकंदासाठी 30 ते 40 लाख! आशिया कपच्या एकाच सामन्यात डिज्ने - स्टार होणार मालामाल

बाबर आणि रिझवान आपल्या अर्धशतकाजवळ पोहचले होते. मात्र 50 चेंडूत 44 धावा करणाऱ्या मोहम्मद रिझवानला दिपेंद्र सिंहने धावबाद केले. रिझवान हा अत्यंत बालीश पद्धतीने धावबाद झाला. तो चेंडू लागेल या भीतीने चेंडू चुकवायला गेला अन् धावबाद झाला. यानंतर आलेला आगा सलमानला लामिछानेने 5 धावांवर बाद करत पाकिस्तानची अवस्था 4 बाद 124 धावा अशी केली.

यानंतर कर्णधार बाबर आझमने अर्धशतकी खेळी करत इफ्तिकार अहमदसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com