PAK vs NZ : अज्ञान दुसरं काय! बाबर आजारी काय पडला पाकिस्तानचे दोन किपर कॅप्टन्सीवरून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Vs New Zealand Captaincy Controversy

PAK vs NZ : अज्ञान दुसरं काय! बाबर आजारी काय पडला पाकिस्तानचे दोन किपर कॅप्टन्सीवरून...

Pakistan Vs New Zealand : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कराचीत पहिला कसोटी सामना सुरू आहे. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तान संघाने मोठा घोळ घातला. पहिल्या कसोटीचा तिसरा दिवस सुरू झाला त्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मैदानावर उतरला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार त्याला फ्लू झाला होता. त्यामुळेच बाबर आझम तिसऱ्या दिवशी मैदानावर उतरला नाही.

हेही वाचा: Mohammed Siraj : माझी बॅग तेवढी लवकर द्या... मोहम्मद सिराजने केली कळकळीची विनंती

बाबर मैदानावर उतरला नसल्यामुळे त्याचा बदली खेळाडू म्हणून मोहम्मद रिझवान मैदानावर उतरला. रिझवानला या कसोटी सामन्यात प्लेईंग 11 मध्ये जागा देण्यात आलेली नाही. मात्र रिझवान फक्त बदली क्षेत्ररक्षक म्हणून काम करत नव्हता तर तो खेळाडूंना कर्णधारासारखे आदेश देत होता इथंपर्यंत ठीक होतं मात्र त्यानंतर रिझवानने असं काही केलं की ते सामनाधिकाऱ्यांना खटकलं त्यांनी सामन्यात हस्तक्षेप करत रिझवानला ताकीद दिली.

आयसीसीच्या नियमानुसार बदली खेळाडूला मैदानावर खेळाडूंना संघातील इतर खेळाडूंना फिल्डिंगबाबत आदेश देण्याची मुभा आहे. मात्र कर्णधारासारखं DRS घ्यायचा निर्णय ते घेऊ शकत नाही. क्रिकेटच्या 24.1.2 च्या नियमानुसार बदली खेळाडू गोलंदाजी आणि कॅप्टनची भुमिका बजावू शकत नाही. मात्र पंचांच्या परवानगीने तो विकेटकिपरची भुमिका बजावू शकतो.' (Sports Latest News)

हेही वाचा: IND vs SL : निवडसमितीने दिला शॉक! 'या' 5 धक्कादायक निर्णयाने चाहते हादरूनच गेले

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी 53 व्या षटकात डेवॉनर कॉनवॉयविरूद्ध पायचीतची जोरदार अपील झाली होती. यावेळी DRS घेण्याची स्थिती निर्माण झाली. त्यावेळी सर्फराज अहमद आणि मोहम्मद रिझवान यांनी गोंधळलेल्या परिस्थिती पंचांशी चर्चा केली. पाकिस्तानने रिव्ह्यू घेतला अन् कॉनवॉय आऊट झाला. मात्र सामन्यात कॅप्टन्सी कोण करत आहे याबाबत मैदानातून वेगळाच संदेश बाहेर गेला.

शेवटी या प्रकरणावर पाकिस्तानकडून बाबर आझमच्या अनुपस्थितीत पाकिस्तानचे नेतृत्व कोण करत आहे याबाबत खुलासा करण्यात आली. पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले की मैदानावर स्टँड - इन कर्णधार हा मोहम्मद रिझवान नाही तर सर्फराज अहमद आहे. त्यामुळे रिझवानचा चांगलाच पचका झाला.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....