ICC ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्ड कपमध्ये 'इथे' भिडणार भारत-पाकिस्तान! ICC करतंय प्लॅनिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan will play all ICC ODI World Cup 2023 matches in bangladesh instead of india

ICC ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्ड कपमध्ये 'इथे' भिडणार भारत-पाकिस्तान! ICC करतंय प्लॅनिंग

Ind Vs Pak in ICC ODI World Cup 2023 : या वर्षी ODI World Cup 2023 हा भारतात होणार आहे. या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. या विश्वचषकातील पाकिस्तानचे सर्व सामने हे बांगलादेशमध्ये आयोजित केले जाऊ शकतात. आयसीसी सध्या हायब्रीड वर्ल्डकपच्या योजनेवर चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे.

आयसीसीच्या बैठकीत पाकिस्तानचा संघ 2023 च्या विश्वचषकातील सामना भारताऐवजी बांगलादेशमध्ये खेळू शकतो यावर चर्चा झाली. यानंतर यावर सर्वांचे एकमतही दिसून येत आहे. दरम्यान भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात पाक क्रिकेटपटूंना व्हिसा देणार असल्याचे भारत सरकारने आयसीसीला सांगितले असले तरी.

पाकिस्तानला 2023चा वर्ल्ड कप भारतात न खेळle भारताला प्रत्युत्तर द्यायच्या विचारात आहे. आशिया कप 2023 स्पर्धाही याच वर्षी होणार आहे. ही पाकिस्तानात आयोजित केली जाणार आहे. आशिया कप 2023 साठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाकिस्तान भारतात वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात येण्याबाबत साशंकता आहे.