World Cup 2019 : बहुचर्चित सामन्यात पाकचा विजय; घरची वाट मात्र निश्चित

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जुलै 2019

 दिवास्वप्न पहाण्यापेक्षा वास्तव स्वीकारत केवळ विजयावर लक्ष देणाऱ्या पाकिस्तानने आपल्या बहुचर्चित अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशचा 94 धावांनी पराभव केला, पण त्याअगोदरच त्यांचे विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांचे समान 11 गुण झाले पण सरस सरासरीच्या जोरावर न्यूझीलंडने उपांत्य फेरी गाठली. 

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : दिवास्वप्न पहाण्यापेक्षा वास्तव स्वीकारत केवळ विजयावर लक्ष देणाऱ्या पाकिस्तानने आपल्या बहुचर्चित अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशचा 94 धावांनी पराभव केला, पण त्याअगोदरच त्यांचे विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांचे समान 11 गुण झाले पण सरस सरासरीच्या जोरावर न्यूझीलंडने उपांत्य फेरी गाठली. 

अशक्‍यप्राय धावांचा डोंगर पाकिस्तान उभारणार का? आणि बांगलादेशला कमीतकमी धावांत गुंडाळणार का? अशा हिंदोळ्यावर झालेल्या लॉर्डस्‌वर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अतिमोठ्या धावसंखेचा नाद सोडून शक्‍य होईल तेवढ्या धावांसाठी प्रयत्न केला आणि 315 पर्यंत मजल मारली त्यानंतर बांगलादेशला 211 धावांत गुंडाळले. 

पाककडून इमाम उल हकने शतक केले तर बाबर आझमची शतक चार धावांनी हुकले. त्यांच्या शाहिन आफ्रिदीने सहा बळी मिळवून बांगलादेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. बांगलादेशच्या मुस्तफिझुर रहिमने पुन्हा अष्टपैलू चमक दाखवताना पाच विकेच आणि अर्धशतक केले पण इतरांचे योगदान न लाभल्यामुळे बांगलादेशचा पराभव झाला. 

नाणेफेक जिंकली, पण.. 
तत्पूर्वी, नाणेफेकेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली तेव्हा क्रिकेट विश्‍वात कमालीची उत्सुकता पसरली होती, पण सलामीवीर फकर झमान आणि इमाम उल हक यांचा पवित्रा पाहून सर्वांना हा सामना केवळ त्या लढतीपुरता निकाली ठरणार याची कल्पना आली. इमाम आणि बाबर यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. धावांचा वेग कायम ठेवत त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 157 धावांची भागीदारी केली. बाबर शतकापासून चार धावा दूर असताना सैफउद्दीनच्या यॉर्करवर बाद झाला. मात्र, इमामने शतकाची संधी साधली परंतु तो बरोबर 100 धावांवर बाद झाला. इमाद वसिमने 26 चेंडूत 43 धावांचा तडाखा दिला. याच इमाद आणि आमिरला अखेरच्या षटकात सलग दोन चेंडूवर बाद करून मुस्तफिझूरने पाच विकेट मिळवण्याची कामगिरी केली. 

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान ः 50 षटकांत 9 बाद 315 (इमाम उल हक 100-100 चेंडू, 7 चौकार, बाबर आझम 96-98 चेंडू, 11 चौकार, इमाम वसिम 43-26 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, महम्मद सैफउद्दीन 9-0-77-3, मुस्तफिझूर रहिम 10-0-75-5) वि. वि. बांगलादेश ः44.1 षटकांत सर्वबाद 221 (शकिब अल हसन 64, लिटॉन दास 32, मोहम्मदुल्ला 29, शाहिन आफ्रिदी 9.1-0-35-6)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan wins against Bangladesh by 94 runs in World Cup 2019