Urvashi-Naseem : नसीमशिवाय उर्वशीला काय सुचेना, इंस्टावर केलं फॉलो, अचानक... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 naseem shah  urvashi rautela

Urvashi-Naseem : नसीमशिवाय उर्वशीला काय सुचेना, इंस्टावर केलं फॉलो, अचानक...

Naseem Shah and Urvashi Rautela : पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उर्वशी नुकतीच आशिया कप मध्ये भारत-पाकिस्तान मॅच पाहताना स्टेडियममध्ये दिसली. तेव्हापासून सोशल मीडियावर उर्वशीचे नाव नसीमसोबत जोडले जात आहे. दोघेही आता एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो केल्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. जेव्हा नसीम आणि उर्वशीचे नाव एकमेकांशी जोडले गेले होते. तेव्हा नसीम यांनी या प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले. नसीमने एका मुलाखतीत सांगितले होते की उर्वशी कोण आहे, त्याला माहित नाही.

नसीमच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नसीमने उर्वशीला इन्स्टाग्रामवर फॉलो केल्याचे त्यामध्ये दिसत आहे. पण काही वेळाने त्याने उर्वशीला अनफॉलो केले. हा स्क्रीनशॉट शेअर करून चाहते दोघांनाही जोरदार ट्रोल करत आहेत.

हेही वाचा: T-20 World Cup साठी भारतीय संघ जाहीर, पण ओपनिंग-बॉलिंग कॉम्बिनेशनच काय?

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात उर्वशीचा व्हिडिओ शेअर करण्यापासून झाली आहे. उर्वशीही भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आली होती. सामन्यानंतर उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नसीमचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये नसीम मैदानात हसताना दिसत आहे, तर उर्वशी त्याच्याकडे पाहून लाजत असल्याचे दिसले.

उर्वशी रौतेलाच्या फॅन पेजने हा व्हिडिओ बनवला. उर्वशी आणि नसीम शाहचे हसतानाचे वेगवेगळे क्षण टिपून चाहत्यांनी एक व्हिडिओ बनवला, जो उर्वशीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला होता. याआधी उर्वशी आणि भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत यांच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या.

हेही वाचा: T20 World Cup : इशानपासून सॅमसनपर्यंत 'या' स्टार खेळाडूंचा टीम इडियामधून पत्ता कट

उर्वशीच्या प्रश्नावर नसीमने एका मुलाखतीत सांगितले होते की, उर्वशी कोण आहे. हे मला माहीत नाही. तो कोणत्या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल शेअर झाला हे पण मला माहीत नाही. मला सध्या लक्ष फक्त क्रिकेटवर द्यायचं आहे. जर कोणी मला पसंत करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण आता क्रिकेट खेळण्याचा त्याचा प्लॅन आहे.

Web Title: Pakistani Cricketer Naseem Shah Followed Urvashi Rautela On Instagram And Immediately Unfollowed Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..