Asad Rauf : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी; माजी अंपायर असद रऊफ यांचं निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Former Umpire Asad Rauf Passes Away

या वृत्ताला त्यांचा भाऊ ताहिर यांनी दुजोरा दिला आहे.

Asad Rauf : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी; माजी अंपायर असद रऊफ यांचं निधन

Former Umpire Asad Rauf Passes Away : क्रिकेट (Cricket) विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आयसीसीचे (ICC) माजी अंपायर (Umpire) आणि पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं (Former Pakistan cricketer) आज निधन झालं.

माजी क्रिकेटर असद रऊफ (Asad Rauf) यांचं लाहोरमध्ये निधन झालं. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या वृत्ताला त्यांचा भाऊ ताहिर यांनी दुजोरा दिलाय.

हृदयविकाराच्या धक्क्यानं असद रऊफ यांचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. BCCI नं सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अंपायरिंगवर बंदी घातल्यानंतर रऊफ लाहोरच्या लांडा बाजारात कपड्यांचं आणि चपलांचं दुकान चालवत होते. रऊफ यांनी आतापर्यंत १७० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून भूमिका बजावली आहे. त्यांनी ४९ कसोटी, २३ टी २० आणि ९८ वन डे सामने खेळले आहेत.

असद यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकूण 231 सामन्यांमध्ये अंपायरिंग केलंय. त्यात 64 कसोटी, 28 टी-20 आणि 139 एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. रऊफ 2013 मध्ये सर्व प्रकारच्या अंपायरिंगमधून निवृत्त झाले होते.